Yelgaon Dam : शेतकरी चढला ३५० फूट उंच टॉवरवर, प्रशासन हादरले!

Farmer protests atop 350-ft tower against government decision : येळगाव धरण बुडीत क्षेत्रातील जमीन ताब्यात घेण्यास विरोध

Buldhana बुलढाणा शहरात रविवारी दुपारी नाट्यमय प्रकार घडला. येळगाव धरणाच्या बुडीत क्षेत्रातील जमीन नगरपालिकेकडून ताब्यात घेतल्याने असंतुष्ट झालेल्या शेतकऱ्याने थेट बीएसएनएलच्या ३५० फुट उंच टॉवरवर चढून प्रशासनाविरोधात आंदोलन छेडले.

तालुक्यातील येळगाव येथील रहिवासी राजू भीमराव काकडे (वय ४०) यांची शेती धरणाच्या बुडीत क्षेत्रात आली होती. शासनाकडून त्यांना मोबदला मिळाल्यानंतरही ते त्या जमिनीत कसोशीने शेती करत होते. मात्र, बुलढाणा नगरपालिकेने ताबा घेत सौंदर्यीकरणाचे काम सुरू केले. यामध्ये रविवारी त्यांच्या शेतात खड्डे खोदण्यात आल्याचे समजताच त्यांनी थेट बुलढाणा गाठले आणि जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील टॉवरवर चढून “बांधकाम तातडीने थांबवा” अशी मागणी केली.

Ramdas Athavle : अपयश आल्यामुळे काँग्रेसकडून मतचोरीचा आरोप

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी धावून आले. तब्बल काही तास समजावून सांगितल्यानंतर काकडे यांना खाली उतरविण्यात यश आले. या प्रकारामुळे बुलढाणा शहरात एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान, या घटनेवरून राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे. महायुती सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन देण्यात येते, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना जमिनीपासून वंचित केले जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. धरण प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील जमिनींचा प्रश्न आजही सुटलेला नाही. मोबदला मिळूनही अनेक शेतकरी तिथेच शेती करत असून त्यांना विस्थापित करण्यासाठी प्रशासनाकडून सक्तीची पावले उचलली जात आहेत.

Ramdas Athavle : मराठा आरक्षणावर आठवलेंचे महत्त्वाचे विधान!

शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे सरकारने सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. अन्यथा आगामी काळात हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.