ZP Elections : इच्छुकांची बॅनरबाजी, स्वतःच केली उमेदवारी जाहीर

Aspirants put up banners, declare their own candidacy : तिकीट मिळण्यापूर्वीच शक्तिप्रदर्शन; राजकीय तापमान वाढले

Buldhana जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची चाहूल लागताच इच्छुक उमेदवारांनी दंड थोपटले असून, जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक रिंगणात उतरण्याच्या निर्धाराने इच्छुकांनी शहरासह ग्रामीण भागातील मोक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सुरू केली आहे. पक्षाची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच अनेक इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांचे फोटो झळकावत स्वतःच उमेदवारी जाहीर केल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे.

जिल्हा परिषदेत सत्ता मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम, तुल्यबळ तसेच निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेले इच्छुक पुढे सरसावताना दिसत आहेत. प्रत्यक्षात जिल्हा परिषदेची सत्ता कुणाच्या हाती जाणार, हे प्रत्येक प्रभाग, झेडपी गट आणि पंचायत समितीच्या गणातून निवडून येणाऱ्या एका-एका सदस्यावर अवलंबून असणार असल्याने प्रत्येक जागेसाठी तीव्र स्पर्धा होणार आहे.

Akola Municipal Corporation : २० प्रभागांत ८० नगरसेवक; ५.५० लाखांहून अधिक मतदार

प्रत्येक पक्षाची रणनीती जरी गोपनीय ठेवली जात असली, तरी अंतर्गत बैठका, नेत्यांचे दौरे आणि इच्छुकांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने तिकिटासाठी मोठी चुरस निर्माण झाली असून, यातून बंडखोरीचे पडसाद उमटण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. गट–गणांमध्ये मेळावे घेऊन पक्षांकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

२८० कोटींचा अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय प्रकल्प लवकर लोकांच्या सेवेत

नगरपालिका निवडणुकांप्रमाणेच आगामी जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीतही राजकीय पक्ष फक्त लोकप्रियतेवर नव्हे, तर जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांवर भर देणार असल्याचे संकेत आहेत. आर्थिक ताकद, संघटनात्मक कौशल्य आणि मतदारांवर प्रभाव टाकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांचीच प्राधान्याने चाचपणी केली जात आहे. संभाव्य उमेदवारांची ताकद, आर्थिक बाजू आणि स्थानिक प्रभाव याची पडताळणी करण्यासाठी पक्षयंत्रणा कामाला लागली आहे.

बॅनरबाजीपासून बैठका आणि अंतर्गत समीकरणांपर्यंत सुरू असलेल्या या घडामोडींमुळे, येणाऱ्या काळात जिल्ह्यातील राजकारण अधिकच तापणार हे मात्र निश्चित आहे.