व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Maratha movement : …तर त्यांचं मोठं नुकसान होईल!

Maratha movement : …तर त्यांचं मोठं नुकसान होईल!

Fadnavis warning on Maratha agitation : मराठा आंदोलनावर फडणवीसांचा इशारा

Mumbai : मराठा समाजाचा मोर्चा आज मुंबईत धडकणार आहे. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा बांधव पुन्हा मोठ्या प्रमाणावर एकत्र आले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या आंदोलनाकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य विशेष चर्चेत आले आहे.

फडणवीस म्हणाले, “आंदोलन ठरवलेल्या नियमांच्या चौकटीत झाले, तर सरकारला काही हरकत नाही. मात्र ओबीसी प्रवर्गात साडेतीनशे जाती आहेत. प्रवेश व नोकऱ्यांमध्ये आधीच कट-ऑफ्स उंचावलेले आहेत. त्यामुळे मराठा समाजासाठी खरा फायदा किती, हे नीट अभ्यासून मागणी करावी लागेल.”

Maratha movement : मनोज जरांगेंचं मुंबईत धडकण्याआधी पोलिसांना हमीपत्र;

त्यांनी स्पष्ट केले की, ईसीईबीसी आरक्षणात राजकीय आरक्षणाचा समावेश होत नाही. जर हेतू राजकीय आरक्षणाचा असेल, तर गोष्ट वेगळी आहे. पण जर उद्दिष्ट सामाजिक-आर्थिक बदल असेल, तर विचारवंतांनी या मागणीचा गंभीरपणे विचार केला पाहिजे.

Maratha movement : जरांगेंना ‘या’ नेत्यांचा प्रत्यक्षात ‘ फुल्ल सपोर्ट’ !

यावेळी फडणवीसांनी विरोधकांनाही थेट इशारा दिला. ते म्हणाले, “काही पक्ष आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांचं नुकसानच होईल, फायदा नाही.”

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “मराठा समाजावर अन्याय होऊ देणार नाही. आधी दिलेलं आरक्षण आम्ही कोर्टात टिकवलं आहे. कुणाचंही आरक्षण काढून घेणार नाही. मात्र लोकशाहीच्या चौकटीबाहेर कुणी जाऊ नये.”
____

error: Content is protected !!