Local Body Elections : भाजपला सहा नगराध्यक्ष; तरीही तीन ठिकाणी उपाध्यक्षपद धोक्यात

Despite having only two mayors, Congress gets opportunities in six places : काँग्रेसकडे केवळ दोन नगराध्यक्ष असूनही सहा ठिकाणी संधी

Amravati नगराध्यक्षपद जिंकूनही अनेक नगरपालिकांमध्ये संख्याबळाच्या अभावामुळे संबंधित पक्षांना उपाध्यक्षपद व स्वीकृत नगरसेवकांची पदे मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सहा नगराध्यक्ष जिंकलेल्या भाजपला तीन नगरपालिकांमध्ये उपाध्यक्षपद गमावण्याची शक्यता आहे. याउलट, केवळ दोन नगराध्यक्ष जिंकलेल्या काँग्रेसला सहा ठिकाणी उपाध्यक्षपद मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे.

मोर्शी नगरपालिकेत तीन प्रमुख पक्षांचे प्रत्येकी सहा नगरसेवक असल्याने तेथे राजकीय पेच निर्माण झाला आहे. चांदूर रेल्वेमध्ये वंचित बहुजन आघाडीने नगराध्यक्षपद जिंकले असले, तरी भाजपने निम्म्याहून अधिक नगरसेवक निवडून आणल्यामुळे वंचितचे वर्चस्व टिकवणे आव्हानात्मक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी निवडणुकीनंतर महायुती व महाविकास आघाडी स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

Sandeep Deshpande : मराठीचा अपमान कराल तर ‘नही बंटोगे, तो भी पिटोगे’

काही पक्ष इतर पक्षांना सोबत घेऊन स्वतंत्र मान्यताप्राप्त गट स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. अशाच गटांना उपाध्यक्षपद व स्वीकृत नगरसेवकांच्या जागा मिळण्याची संधी असल्याने स्थानिक राजकारणात नवी समीकरणे आकार घेत आहेत.

भाजपने धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, धारणी, वरुड आणि शेंदुरजनाघाट येथे नगराध्यक्षपदे जिंकली आहेत. यापैकी धामणगाव रेल्वे, वरुड आणि शेंदुरजनाघाट या तीन नगरपालिकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे येथे उपाध्यक्षपद मिळण्याची शक्यता अधिक असून, स्वीकृत नगरसेवकांच्या पदांसाठी मात्र अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत.

दरम्यान, दर्यापूर आणि चिखलदरा येथे नगराध्यक्षपद जिंकलेल्या काँग्रेसला संख्याबळाच्या जोरावर उपाध्यक्षपद मिळवण्याची संधी आहे. भाजपकडे नगराध्यक्षपद असलेल्या अचलपूर, अंजनगाव सुर्जी व धारणी, तसेच शिवसेना (उबाठा)ने नगराध्यक्षपद जिंकलेल्या नांदगाव खंडेश्वर येथे महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरल्यास काँग्रेसला उपाध्यक्षपद व स्वीकृत नगरसेवकांच्या जागा मिळू शकतात.

धामणगाव रेल्वे नगरपालिकेत भाजपने नगराध्यक्षपदासह एकहाती सत्ता मिळवली असल्याने उपाध्यक्षपद व स्वीकृत नगरसेवकांची पदे मिळवताना कोणतीही अडचण येणार नाही. वरुडमध्येही भाजपने २६ पैकी १८ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले असून, तेथे उपाध्यक्षपद सहज मिळण्याची शक्यता आहे.

Prakash Mahajan : मनसेचा माजी नेता शिंदेंच्या शिवसेनेत!

मात्र, वरुडमध्ये स्वीकृत नगरसेवकांची तीन पदे मिळवणे भाजपसाठी आव्हानात्मक ठरू शकते. राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, काँग्रेसचे दोन आणि प्रहार संघटनेचा एक नगरसेवक एकत्र आल्यास त्यांना एक स्वीकृत नगरसेवक पद मिळू शकते.

पहिल्याच सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष निवडीसोबतच स्वीकृत नगरसेवकांचीही निवड केली जाणार आहे. एकूण सदस्यसंख्येच्या दहा टक्के जागा स्वीकृत नगरसेवकांसाठी राखीव असतात. या पदांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वत्र राजकीय हालचालींना वेग आला आहे.