MNS leader aggressively responds to Uttar Bharatiya Vikas Sena : मनसे नेत्याचे उत्तर भारतीय विकास सेनेला प्रत्युत्तर
Mumbai ब्रुहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्टर टाकलं, ज्यात “मराठीचा अपमान केला तर नही बटोगे तोही पिटोगे.” असं लिहिलं होतं. हा संदेश व्हायरल झाल्यानंतर राजकीय वादाला तोंड फुटले आणि मुंबईत पोस्टर वॉर सुरू झाला. विरोधी पक्षांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या असून, मराठी भाषा आणि उत्तर भारतीय मतदारांच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. त्याआधी बटोगे तो पिटोगे असं पोस्टर लावण्यात आलं होतं. त्याला उत्तर म्हणून संदिप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संदीप देशपांडे यांनी या वादावर आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले, “त्यांनी काही एआय जनरेटेड माकडे वापरून ‘बांटोगे तो पिटोगे’ असा नारा देणारे पोस्टर्स लावले आहेत. मी त्यांना स्पष्ट सांगतो की, जर तुम्ही मराठी भाषा किंवा मराठी संस्कृतीचा अपमान करण्याचा प्रयत्न केलात तर ‘नही बंटोगे तो भी पिटोगे.’ मराठी माणसाचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. हा वाद मराठी विरुद्ध उत्तर भारतीयांचा नाही, तर अपमान सहन न करण्याचा आहे.” देशपांडे यांनी भाजपवर उत्तर भारतीय मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचा आरोप केला आणि शिंदे-फडणवीस सरकारवरही टीका केली.
हा वाद उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांच्या एका विधानाने सुरू झाला. शुक्ला यांनी मराठी भाषा आणि मराठी माणसाचा अपमान करणारे वक्तव्य केल्याचा आरोप मनसेने केला. त्यानंतर मुंबईच्या रस्त्यांवर उत्तर भारतीय संघटनांच्या वतीने पोस्टर्स लागले, ज्यावर “उत्तर भारतीय बंटोगे तो पिटोगे” असा संदेश होता. मनसेने याला भाजपचे कपट असल्याचे म्हटले आहे आणि प्रत्युत्तरादाखल संदीप देशपांडे यांनी पोस्टर लावले. त्यावर लिहिले होते, “मराठीचा अपमान कराल तर नही बंटोगे, तो भी पिटोगे.”
BMC Election : इतर पक्षांचं ठरेना, पण आम आदमी पार्टीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
हा पोस्टर वॉर मुंबईच्या विविध भागांत पसरला असून, मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार मोहीम उघडली आहे. बीएमसी निवडणुका १५ जानेवारीला होणार असताना हा वाद राजकीय वातावरण आणखी तापवणारा ठरला आहे. नुकताच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांमध्ये युती जाहीर झाली असून, मराठी माणसाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्ष एकत्र आले असल्याचा दाव केला आहे. मात्र, आता हा भाषा वाद युतीला बळ देणारा ठरतो की मतदारांना विभाजित करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.








