Police use force to control crowd at meeting : गर्दी आवरण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर
Akola महानगरपालिका निवडणुकीतील ‘एमआयएम’च्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रविवार, ४ जानेवारी रोजी रात्री अकोला शहरात आयोजित एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या जाहीर सभेत गोंधळ उडाला. सभा संपताच ओवैसी यांना पाहण्यासाठी मंचाजवळ प्रचंड गर्दी उसळल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. गर्दी नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.
अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरपीटीएस रोडवरील शाह जुल्फीकार दरगाह मैदानात ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला एमआयएमच्या कार्यकर्त्यांची आणि समर्थकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. ओवैसी यांचे भाषण अंतिम टप्प्यात असतानाच त्यांना जवळून पाहण्यासाठी कार्यकर्ते मंचाकडे धाव घेतल्याने गोंधळ निर्माण झाला. भाषण संपताच कठडे ओलांडून मंचासमोर मोठी गर्दी जमा झाल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून सौम्य बळाचा वापर करत गर्दी नियंत्रित केली.
Devendra Fadnavis : अमरावतीत आयटी, टेक्स्टाईल पार्क; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
यावेळी खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शहरातील समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिका निवडणुकीत नागरिकांनी आपल्या बहुमूल्य मताचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले. मुस्लिम आणि दलित वस्ती असलेल्या भागांमध्ये रस्ते, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा का उपलब्ध नाहीत, असा सवाल उपस्थित करत त्यांनी अकोला शहरातील काही ठराविक भागांमध्येच विकासकामे होत असल्याचा आरोप केला.
Amravati Municipal Corporation : राणा-खोडके यांच्यात ‘ओपन वॉर’, आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले
महाराष्ट्रात जन्मदाखल्यांचे वितरण बंद केल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर टीका केली. या सभेला एमआयएमचे नेते युसुफ पुंजानी, हाजी सज्जाद हुसेन, सम्राट सुरवाडे, सै. मोहसीन अली, मुस्तफा पहेलवान, मो. सोहेल कादरी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








