Municipal election : काँग्रेसला मोठा धक्का; निलंबनानंतर ‘ते’ १२ नगरसेवक थेट भाजपात

Kamal has now taken action because of the alliance : आघाडी केल्यामुळे कारवाई आता हाती घेतले कमळ

Thane: अंबरनाथ नगर परिषदेच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलेले तब्बल १२ नगरसेवक अखेर भाजपामध्ये दाखल झाले आहेत. भाजपासोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे काँग्रेसने या नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली होती. मात्र या कारवाईनंतर अवघ्या काही दिवसांतच या सर्व नगरसेवकांनी थेट कमळ हाती घेत भाजपामध्ये प्रवेश केला असून अंबरनाथमधील काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

अंबरनाथ नगर परिषदेत भाजप आणि काँग्रेस यांच्यात आघाडी होणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली होती. या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघाडीचा कोणताही निर्णय नसल्याचे स्पष्ट केले होते. त्याचवेळी काँग्रेसने भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेणारे स्थानिक नेते प्रदीप पाटील यांच्यासह १२ नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले होते.

Pcmc election: भाजपवरील आरोपांनंतर मुख्यमंत्र्यांशी कोणतीही चर्चा नाही

या निलंबनानंतर आता नाट्यमय घडामोडी घडत नवी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात या सर्व नगरसेवकांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. काँग्रेसमधून बाहेर पडलेले हे नगरसेवक भाजपच्या गोटात गेल्याने अंबरनाथमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Municipal elections : तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार,

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये अंबरनाथमधील काँग्रेसचे दीर्घकाळ नेतृत्व करणारे प्रदीप नाना पाटील यांचाही समावेश आहे. त्यांच्यासह दर्शना उमेश पाटील, अर्चना चरण पाटील, हर्षदा पंकज पाटील, तेजस्विनी मिलिंद पाटील, विपुल प्रदीप पाटील, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजवणी राहुल देवडे, दिनेश गायकवाड, किरण बद्रीनाथ राठोड आणि कबीर नरेश गायकवाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

प्रदीप पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अंबरनाथमधील काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळली होती. त्यामुळे त्यांच्यासह १२ नगरसेवकांचा भाजप प्रवेश हा अंबरनाथमधील काँग्रेससाठी मोठा राजकीय धक्का मानला जात असून, नगर परिषदेत भाजपची ताकद या प्रवेशामुळे लक्षणीयरीत्या वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.

___