व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Municipal elections : तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार,

Municipal elections : तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार,

Eknath Shinde’s big move, double blow to BJP-Congress : एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, भाजप-काँग्रेसला दुहेरी शह

Latur : राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असताना त्याआधीच लातूर महापालिका निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतील तब्बल 38 अपक्ष उमेदवार आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या माध्यमातून भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना एकाचवेळी शह दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

लातूर महापालिका निवडणूक 2026 अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे असतानाच ही घडामोड समोर आली आहे. आज संध्याकाळी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या 38 अपक्ष उमेदवारांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे लातूरमधील निवडणुकीचे संपूर्ण गणित बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिंदे गटाने आतापर्यंत 11 जागांवर अधिकृत उमेदवार उभे केले असताना, अपक्षांचा मोठा पाठिंबा मिळाल्याने शिवसेना शिंदे गटाची ताकद लक्षणीयरीत्या वाढणार आहे.

Bmc election : राहुल नार्वेकरांवर धमकीचे आरोप; ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद,

लातूर महानगरपालिकेत एकूण 18 प्रभाग असून 70 जागांसाठी निवडणूक होत आहे. भाजप सर्व 70 जागांवर स्वतंत्र लढत देत आहे. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी करत 65 जागांवर काँग्रेस आणि 5 जागांवर वंचितचे उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 60 जागांवर थेट लढत देत असून उर्वरित जागांवर पुरस्कृत उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 17 जागांवर, शिवसेना ठाकरे गट 9 जागांवर, तर एमआयएम 9 जागांवर स्वतंत्र लढत देत आहे.

या पार्श्वभूमीवर 38 अपक्ष उमेदवारांचा शिंदे गटात होणारा प्रवेश निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे अपक्ष उमेदवार नेमके कोणत्या प्रभागांतील आहेत, यावर पुढील राजकीय समीकरणे ठरणार असून भाजप आणि काँग्रेससाठी ही मोठी डोकेदुखी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

लातूर महापालिकेचा मागील इतिहास पाहिला तर 2017 च्या निवडणुकीत मोठे सत्तांतर घडले होते. 2014 मध्ये राज्य आणि केंद्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर बदललेल्या राजकीय वातावरणाचा फायदा घेत भाजपाने काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या लातूरमध्ये एकहाती सत्ता मिळवली होती. भाजपाचे नेते संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने 36 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला 31 जागांवर समाधान मानावे लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली होती, तर शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांना खातेही उघडता आले नव्हते.

Bmc election : मुंबई आणि मराठी अस्मितेचा ‘डेथ वॉरंट’ निघाल्याचा आरोप

आता 2026 च्या निवडणुकीत मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी असून, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अपक्ष उमेदवारांची मोठी फळी आपल्या बाजूने वळवून लातूरच्या राजकारणात नवा ट्विस्ट दिला आहे. मतदानापूर्वी घडलेली ही खेळी कोणाच्या पारड्यात सत्ता टाकणार, याकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!