Maintenance work by Mahavitaran hits water supply; Malkapur to receive water once every 14 days : वीजपुरवठा खंडित, पाणीपुरवठा विस्कळीत; मलकापूरकरांची चिंता वाढली
Malkapur महावितरण कंपनीकडून सुरू असलेल्या वृक्षतोड आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून त्याचा थेट परिणाम आता मलकापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. आधीच दहा ते बारा दिवसांआड होणारा पाणीपुरवठा आता तब्बल चौदाव्या दिवशी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात नगरपालिकेने अधिकृत सूचना जारी केल्याने शहरात नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मलकापूर शहराला हतनूर धरणाच्या बॅंक वॉटर योजनेद्वारे पूर्णा नदी पात्रातून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून शहरात नियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायम असून, सध्या जलसाठा उपलब्ध असतानाही प्रभावी नियोजनाचा अभाव असल्याची नाराजी नागरिकांतून व्यक्त होत आहे.
Bacchu kadu : मला बदनाम करण्यासाठी ‘वॉर रूम’, बच्चू कडूंचा आरोप
पालिकेच्या माहितीनुसार, जलशुद्धीकरण केंद्र आणि जॅकवेल येथे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाण्याची उचल, शुद्धीकरण आणि वितरण प्रक्रिया विस्कळीत होत आहे. ७ मे रोजी पालिकेकडून जारी करण्यात आलेल्या सूचनेत वीजपुरवठ्याअभावी पाणीपुरवठा दोन ते तीन दिवस उशिराने होण्याची शक्यता स्पष्ट करण्यात आली आहे. परिणामी, शहरात पाणीपुरवठा आता १४ दिवसांआड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Mahayuti plan : विरोधकांची झोप उडवणारा महायुतीचा नवा ‘पॉवर प्लॅन’
दरम्यान, नगराध्यक्ष अतिक जवारीवाले यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मलकापूरच्या पाणीप्रश्नाचा मुद्दा उपस्थित केला होता. शहरासाठी एक्स्प्रेस फीडर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यावर पालकमंत्री मकरंद पाटील यांनी महावितरण अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या.मात्र, अद्याप परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याने पालकमंत्र्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष झाले काय, असा सवाल आता नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.








