Chief Minister Devendra Fadnavis deals a blow to Tukaram Mundhe’s decision; ban on the sale of loose edible oil put on hold : मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, व्यवसायाच्या पद्धतीत बदल करण्यासाठी व्यापाऱ्यांना एक वर्षाचा वेळ
Mumbai अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सुट्या खाद्यतेल विक्रीवर आणलेल्या बंदीच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तूर्तास एक वर्षाची स्थगिती दिली आहे. मंत्रालयात पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांना मोठा दिलासा देत, विद्यमान कायद्यानुसार व्यवसाय पद्धतीत आवश्यक बदल करण्यासाठी एक वर्षाचा संक्रमण कालावधी जाहीर केला आहे.
या बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे आणि महाराष्ट्र तौलिक महासंघाच्या प्रतिनिधींसह विविध खाद्यतेल संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामीण भागातील सुट्या खाद्यतेलाची गरज आणि या व्यवसायावर अवलंबून असणारा हजारो व्यावसायिकांचा रोजगार विचारात घेऊन, कायदा आणि सामान्य माणसाची गरज यात समतोल साधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
Rahul Gandhi Go Back : ‘राहुल गांधी गो बॅक’; नाशिक दौऱ्यादरम्यान भाजप महिला आघाडीची नारेबाजी
सुट्या खाद्यतेल विक्रीवरील कारवाईला एका वर्षासाठी स्थगिती देण्यात आली असली, तरी या मुदतीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही आणि कायद्याचे पालन करणे बंधनकारक राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
या एक वर्षाच्या काळात पारंपरिक व्यावसायिकांना कायदेशीर चौकटीत आणण्यासाठी, पॅकेजिंग सुविधा निर्माण करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा उभारण्यासाठी एफडीए व व्यापारी प्रतिनिधींच्या दोन संयुक्त समित्या स्थापन केल्या जातील.
Manoj Jarange : “तुम्ही फाशी घेण्याची भाषा करू नका”, जरांगेंनी अधिकाऱ्यांना थांबवलं
या समित्या एक महिन्याच्या आत सरकारला अहवाल सादर करतील आणि कायद्यानुसार बदल स्वीकारणाऱ्या व्यावसायिकांना राज्य शासनाकडून आवश्यक मदत, सुविधा व सबसिडी उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.








