व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण अजित दादांच्या अपघातामागचे ‘मफलरी’ कोण ? रोहित पवार करणार गौप्यस्फोट

अजित दादांच्या अपघातामागचे ‘मफलरी’ कोण ? रोहित पवार करणार गौप्यस्फोट

१० ऑक्टोबरचा मुहूर्त, महायुती सरकारविरुद्ध आरपारची लढाई

Mumbai अजित पवार यांच्या भीषण विमानापघातावरून राजकारणात पेटलेला संशय आणि आरोपांचा वणवा आता आणखी भडकण्याची शक्यता आहे. हा अपघात नसून थेट ‘घातपात’ असल्याचा खळबळजनक दावा करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आता महायुती सरकारविरुद्ध थेट आरपारची लढाई पुकारली आहे. येत्या १० ऑक्टोबरला या कथित घातपातामागे असणाऱ्या काही बड्या ‘मफलरीं’चे चेहरे उघडे पडणार, असा थेट इशारा देत रोहित पवारांनी राजकीय वर्तुळात भूकंप घडवून आणला आहे.

अजित पवार महायुतीत उपमुख्यमंत्री पदावर असतानाही अस्वस्थ होते आणि ते दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र आणण्याच्या तयारीत होते, असा दावा सातत्याने केला जात आहे.

एकत्रीकरणाचा मुहूर्त ठरला असताना आणि दादा एका मोठ्या गौप्यस्फोटाच्या तयारीत असतानाच त्यांचा संशयास्पद अपघात घडवून आणला गेला, असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला आहे. दुसरीकडे, भाजप आणि महायुती सरकारने मात्र धुक्यामुळे धावपट्टी न दिसणे आणि तांत्रिक बिघाड हेच या दुर्दैवी घटनेचे कारण असल्याचे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आमच्या पत्राची साधी दखलही घेतली नाही

अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या, तर पुत्र पार्थ पवार राज्यसभेत गेले. मात्र, पक्षातील अंतर्गत राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या अपघाताचे गूढ उकलण्यासाठी रोहित पवार हे एकटेच मैदानात उतरलेले दिसत आहेत. काही संशयास्पद पुरावे मांडल्यानंतर आता त्यांनी थेट १० ऑक्टोबरची डेडलाईन दिल्यामुळे सर्व राजकीय विश्लेषक आणि जनतेचे लक्ष या नव्या गौप्यस्फोटाकडे लागले आहे.

दुष्काळी यादीत तालुका सुटल मागणीवर मुख्यमंत्र्यांचा खास शेरा

केवळ अपघाताचा मुद्दाच नव्हे, तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन दिल्लीत दिलेली धडक, आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नांवरून महायुती सरकारला घेतलेले धारेवर—यावरून रोहित पवार आगामी काळात सरकारविरोधात अत्यंत आक्रमक आणि टोकदार संघर्षाच्या मूडमध्ये असल्याचे स्पष्ट होत आहे. १० ऑक्टोबरला बाहेर येणाऱ्या ‘मफलरीं’च्या नावांनी महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते नवे वादळ येणार, याकडे संपूर्ण राज्याचे डोळे लागले आहेत.

error: Content is protected !!