Sanjay Raut : महाराष्ट्र तोडला, एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं अन् एक तुकडा त्यांच्या तोंडावर फेकला, आता ते..!

 

Sanjay Raut said Maharashtra was divided, Eknath Shinde was taken along and a piece was thrown in his face : भाजप आणि त्यांचे बगलबच्चे शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांचे अस्तित्व मिटवण्याच्या प्रयत्नांत

Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या. तेव्हापासून शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांचा आत्मविश्वास चांगलाच बळावला आहे. खासदार संजय राऊत यांनी आज एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली. ते म्हणाले, भाजपने महाराष्ट्र तोडला, एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं अन् एक तुकडा त्यांच्या तोंडावर फेकला, आता ते तो तुकडा खात आहेत.

मुंबईत आज (१९ एप्रिल) पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, अशा महाराष्ट्रद्रोही लोकांना आम्ही घरात घेणार नाही. जास्ताीत जास्त काय होईल? आम्हाला सत्ता मिळणार नाही. पण आम्ही तडजोड करणार नाही. राज ठाकरे यांनीही अशा राज्यद्रोही लोकांशी संबंध ठेऊ नये, ही आमची अट नाही तर भावना आहे. शिवाजी महाराजांचे शत्रू हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. महाराष्ट्रासंदर्भात परिस्थिती गंभीर झाली आहे. राज्यकर्ते बोलतात एक अन् करतात वेगळं. आम्ही अशांना कदापि थारा देणार नाही. याच भूमिकेचा पुरस्कार राज ठाकरेंनी आणि त्यांच्या लोकांनी करणे गरजेचे आहे.

Raj – Uddhav Thackeray : राज – उद्धव एकत्र येणार ? महाराष्ट्राचे राजकारण बदलणार ?

भाजप आणि त्यांचे बगलबच्चे छत्रपती महाराज आणि बाळासाहेबांचे अस्तित्व मिटवण्याच्या प्रयत्नांत आहेत, असा गंभीर आरोप खासदार राऊत यांनी केला. अशा वेळी दोन्ही ठाकरेंनी ‘साद आणि प्रतिसाद’, ही भूमिका घेतली असेल, तर महाराष्ट्र त्याचं स्वागतच करेल. आता उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका मांडल्यावर आम्ही ‘वेट अॅन्ड वॉच’वर राहू. संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू असताना संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये अनेक वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक होते. त्यांनीही तेव्हा आपसांतले वाद आणि मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. आम्हीही त्याच प्रवाहातील कार्यकर्ते आहोत, असेही संजय राऊत म्हणाले.