व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Ashwati Dorje : पोलीस महासंचालकांच्या प्रश्नाने उडाला गोंधळ!

Ashwati Dorje : पोलीस महासंचालकांच्या प्रश्नाने उडाला गोंधळ!

Stop illegal alcohol selling in villeges : पोलीस पाटलांकडून घेतली गुन्ह्यांची माहिती; थेट साधला संवाद

Yavatmal वरीष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये एखादा गुगली प्रश्न टाकला की साऱ्यांचाच गोंधळ उडत असतो. बरेचदा कर्मचाऱ्यांची फिरकी घेण्यासाठीही असा प्रश्न विचारला जातो. पण अपर पोलीस महासंचालक अश्वती दोरजे यांच्या एका प्रश्नाने पोलीस पाटलांची चांगलीच भंबेरी उडाली. त्यांनी अवैध दारूविक्री कुठे होते, असा सवाल केला. या प्रश्नातून त्यांनी दारू विक्री सुरू आहे, पण त्याकडे दुर्लक्ष होत आहे, हेच सांगण्याचा प्रयत्न केला.

कळंब येथील पोलीस ठाण्यात सोमवारी सकाळी तालुक्यातील पोलीस पाटलांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला अपर पोलिस महासंचालक अश्वती दोरजे उपस्थित होत्या. त्यांनी थेट पोलिस पाटीलांशी संवाद साधत त्यांच्याकडे गावातील गुन्हेगारीबाबत चौकशी केली. सोबतच अवैध दारूची विक्री कुठे होते? सर्वाधिक देशी व हातभट्टी कोणत्या गावात विकली जाते? अशी विचारणा अपर महासंचालक यांनी केली.

Harshawardhan Sapkal : राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला!

कळंब पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या सर्व अभिलेख रजिष्टरची तपासणी केली. तालुक्यामध्ये कोणते गुन्हे जास्त घडतात. ते घडू नये यासाठी काय उपाययोजना केली जाते, कोणते गाव संवेदनशील आहे, वारंवार जातीय तणावाचे प्रसंग कुठल्या गावात घडतात, जातीय सलोखा ठेवण्यासाठी काय प्रयत्न केले जाते, कोणते आणि किती गुन्हे पेडिंग आहेत, अवैध दारू कुठे विकली जाते, याची सर्व माहिती अपर महासंचालक अश्वती दोरजे यांनी घेतली.

Heat Wave : लोकांच्या मागणीला ‘ग्रीन सिग्नल’; दुपारी सिग्नल बंद !

यासोबतच क्राइम रेट वाढू नये, यासाठी कोणती खबरदारी घ्यावी. पेंडिंग गुन्ह्यांचा तपास तातडीने पूर्ण करावा. तक्रारदाराला योग्य मार्गदर्शन आणि वागणूक द्यावी, यासंबंधीच्या सूचना त्यांनी केल्या. यावेळी अपर पोलिस महासंचालक यांच्या तपासणी पथकाकडून कागदपत्रांची पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाने, ठाणेदार राजेश राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश चवरे, पोलिस उपनिरीक्षक सागर भारस्कर उपस्थित होते.

error: Content is protected !!