Congress state president Harshvardhan Sapkal promises to fight for Koli brothers : कोळी बांधवांवर होतोय अन्याय, काँग्रेस मिळवून देणार भरपाई
Mumbai : पारंपरिक मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांच्या व्यवसायात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सरकारने कोळी बांधवांसाठी आणलेली योजना फसवी आहे. मासेमारीला कृषीचा दर्जा दिला आहे. पण त्यातून फार काही साध्य होत नाहीये. कारण मासेमारीत ठेकेदार आणि भांडवलदार शिरले आहेत. पण काँग्रेस कोळी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
मुंबईतील टिळक भवन येथे महाराष्ट्र मच्छिमार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच झाली. त्यावेळी सपकाळ बोलत होते. ते म्हणाले, कोळी बांधवांसमोर ज्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत, त्या सोडवण्यासाठी काँग्रेस पक्ष तुमच्या सोबत आहे. पण यासाठी तुम्ही तुमची संघटना बळकट केली पाहिजे. शासनाने नुकताच काढलेला जीआर अन्यायकारक आहे. तो रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
Harshawardhan Sapkal : काँग्रेस मैदानात; जातीय द्वेषाविरोधात थोपटणार दंड!
मच्छिमारांना बोटीसाठी लागणाऱ्या डिझेलवर सवलत मिळाली पाहिजे. भांडवलदार आणि ठेकेदार मासेमारांना त्रास देत आहेत. खर्च व उत्पन्न यांचा मेळ लागत नाही. प्रकल्पग्रस्तांचा दाखला मिळत नाही, तो मिळाला पाहिजे, भाजप सरकारने बंद केलेल्या सवलती पुन्हा लागू केल्या पाहिजे, अशा मागण्या बैठकीत कोळी बांधवांकडून करण्यात आल्या. या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी काँग्रेस पक्ष ताकत उभी करेल, असे सपकाळ म्हणाले.
Harshawardhan Sapkal : सरकारने जैन बांधवांच्या भावना पायदळी तुडवल्या!
प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन अॅड. गणेश पाटील, फिशरमन काँग्रेसचे अध्यक्ष मार्तंड नाखवा, ऑल इंडिया फिशरमन काँग्रेसचे उपाध्यक्ष रामदाक संधे, विभागीय अध्यक्ष प्रकाश नगरे, कोकण विभागीय अध्यक्ष उल्हास वाटकरे, मुख्य संयोजक मिल्टन यांच्यासह फिशरमन काँग्रेसचे सदस्य या बैठकीला उपस्थित होते.








