व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Eknath Shinde : शिंदेसेना, राष्ट्रवादीला धक्का; दिग्गजांचा भाजपात प्रवेश

Eknath Shinde : शिंदेसेना, राष्ट्रवादीला धक्का; दिग्गजांचा भाजपात प्रवेश

Senior leaders from Shivsena (Shinde) and NCP Ajit Pawar join the BJP : महायुतीत धुसफूस? वाशिममधील पदाधिकाऱ्यांची भाजपकडे वाटचाल

Washim जिल्ह्यातील महायुतीच्या घटक पक्षांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. या दोन्ही पक्षांतील काही प्रमुख पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे पदाधिकारी सोमवारी (दि. ३ ऑगस्ट) मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून संबंधित नेत्यांमध्ये भाजप प्रवेशाबाबत चर्चा सुरू होती. अखेर मुंबईतील कार्यक्रमात त्यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगितले जात आहे.

PDKV : पीडीकेव्हीतील कथित आर्थिक गैरव्यवहार : १३८ फायली गायब, ११५ बनावट देयकांचा आरोप

या प्रवेशामुळे वाशिम जिल्ह्यातील शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः ग्रामीण भागातील काही प्रभावी पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यास आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे बदलू शकतात.

Tukaram Mundhe : ‘मी इथे चहापानाला आलो नाही’; तुकाराम मुंढेंनी बैठकीत अधिकाऱ्यांना फटकारले

दरम्यान, प्रवेश करणाऱ्या नेत्यांची अधिकृत यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या घडामोडींमुळे महायुतीतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत असून, संबंधित पक्षांकडून यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

error: Content is protected !!