Local Body Elections : सगळं लक्ष निवडणुकीवर, भाजपचा जोर बुथ समित्यांवर!

 

BJP forms 1,741 booth committees : अकोल्यात 1,741 बुथ समित्यांची रचना; महानगर, ग्रामीणचा समावेश

Akola स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पेच अद्याप सुटलेला नाही. पण भाजप जोरदार तयारीला लागले आहे. भाजपचा पूर्ण जोर बुथ समित्यांवर आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्याच पार्श्वभूमीवर भाजपने अकोल्यात १७४१ बुथ समित्यांची रचना केली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या अकोला महानगर व अकोला ग्रामीण जिल्ह्यांतील संघटनात्मक निवडणुका बुथ ते मंडळ स्तरापर्यंत पार पडल्या असून, यामध्ये ग्रामीण भागात १,२५९ व महानगरात ४८२ अशा एकूण १,७४१ बुथ समित्या यशस्वीरित्या गठित झाल्या आहेत. ही माहिती भाजप अकोला जिल्ह्याचे प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी यांनी दिली. या निवडणुका पार पडल्यामुळे आता जिल्हा, तालुका व महानगर अध्यक्षांच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीच्या कार्यवाहीसाठी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, अकोल्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, आ. वसंत खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, महानगर अध्यक्ष जयंत मसने आणि निवडणूक अधिकारी विजय अग्रवाल व डॉ. अमित कावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारिणी गठित करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे तसेच माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली.

Local Body Elections : आमगाव तालुक्यातील महिला राज!

निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये डॉ. संजय शर्मा, मनोहर राहणे, किशोर मांगटे, शंकरराव वाकोडे, प्रेमानंद श्रीरामे, राजेश नागमते, महादेव काकड, प्रकाश श्रीमाळी, गिरीश जोशी, केशव ताथोड, डिगंबर गावंडे, गणेश तायडे, अनिल गावंडे, प्रभाकर मानकर, अंबादास उमाळे, रमण जैन, पुरुषोत्तम चौखंडे, पवन महल्ले, देवाशिष काकड, धनंजय धबाले, सागर शेगोकार, संदीप गावंडे, तुषार भिरड आणि गणेश अंधारे यांनी सक्रिय भूमिका बजावली.

Local Body Elections : मंडळ अध्यक्ष नव्हे, निवडणुका जिंकण्याची सोय!

महानगरातील नविन मंडळ अध्यक्षांची निवड :

गोरक्षण रोड मंडळ – रणजित खेडकर

मलकापूर मंडळ – गोपाळ मुळे

डाबकी रोड मंडळ – तुषार भिरड

हरिहरपेठ मंडळ – अमोल गिते

पूर्व मंडळ – संदीप गावंडे

खोलेश्वर मंडळ – नितेश पाली

रेल्वे स्टेशन मंडळ – नितीन राऊत