Breaking

Uddhav Thackrey Shivsena : रिकाम्या खुर्चीला हार घालून गांधीगिरीतून निषेध!

Demand for immediate commencement of road construction : कर्तव्यावर गैरहजर जलसंधारण अभियंत्याविरोधात उद्धव सेनेचे आंदोलन

Buldhana मृद व जलसंधारण विभागाचे अभियंता अमोल मुंडे यांच्याकडून सतत ड्युटीला दांडी मारण्यात येत असल्याच्या आरोपांवरून, २ मे राेजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने गांधीगिरी पद्धतीने निषेध आंदोलन केले. मलकापूर तालुकाप्रमुख दीपक चांभारे यांच्या नेतृत्वाखाली रिकाम्या खुर्चीला हार अर्पण करून निष्क्रियतेचा विरोध करण्यात आला.

शिराढोण (ता. मलकापूर) येथील मोहगंगा नदीवरील सिमेंट काँक्रिट बंधाऱ्यामुळे २०१९ पासून रस्ता बंद होण्याचे प्रकार सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीनंतर २०२३ मध्ये नदीपात्रात हयूम पाइप बॉक्स कल्व्हर्ट बांधण्यात आले. मात्र, अयोग्य डिझाईन व निकृष्ट कामामुळे पहिल्याच पावसात रस्ता वाहून गेला. दोन्ही बाजूंचा अ‍ॅप्रोच नष्ट झाल्याने वाहतूक ठप्प झाली.

शेतकऱ्यांनी वारंवार निवेदने दिल्यानंतरही विभागाने दुर्लक्ष केले, त्यामुळे शेतमाल खराब होणे, पीक वाहून जाणे, शेती अवजारे शेतात न नेता येणे अशा गंभीर अडचणी निर्माण झाल्या. या सर्व प्रकाराला अभियंता मुंडे यांची अनुपस्थिती आणि विभागाची उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला.

Vidarbha Farmers : आधी पंचनामे करा, मगच राजकारण!

दाेन मे राेजी आंदोलनादरम्यान रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे यांना निवेदन दिले. त्यांनी लवकरात लवकर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे सूत्रांकडून समजते.

Chief Minister’s Help Desk : गरजू रुग्णांना आता शहरातच मिळणार मदतीची माहिती

रस्ता दर्जेदार व कायमस्वरूपी तातडीने सुरू करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागण्या आहेत. या आंदोलनात सुरेश बऱ्हाटे, राजेंद्र काजळे, पांडुरंग बहऱ्हाटे, परशुराम बहऱ्हाटे, ओंकार बऱ्हाटे, गोपाळ पाटील, सुनील विखारे, अजय विखारे, गणेश सुशीर, सतीश शेळके, प्रफुल्ल बहऱ्हाटे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते.