The thief vandalized police station And the police were walking outside : मद्यधुंद युवकाला तासाभरानंतर अटक
Yavatmal येथील बसस्थानक परिसर गुन्हेगारांचा अड्डा झाला आहे. येथे खिसे कापू व चोरटे सक्रिय असतात. येथे पोलिस चौकी तयार करण्यात आली आहे. मात्र, सोमवारी दुपारी एका युवकाने थेट पोलिस चौकीत जाऊन आतून दार लावले. तेथील साहित्याची तोडफोड केली. या घटनेने एकच खळबळ उडाली. नंतर बाहेर फिरत असलेले पोलीस परत आले. काही वेळानंतर चौकीचे दार उघडून त्या युवकाला ताब्यात घेतले.
पोलिस चौकी सोबतच तेथे एसटी पार्सल कार्यालय आहे. तेथे संगणक, की-बोर्ड, सीपीयू, बॅटरी, यूपीएस असे कार्यालयीन साहित्य होते. त्या युवकाने सर्व साहित्याची तोडफोड केली. तेथे असलेली आलमारी पाडली, खुर्चीची मोडतोड केली. तो जोरजोरात साहित्य जमिनीवर आपटत असल्याने त्याचा आवाज लगतच असलेल्या एसटी चौकशी कक्षात पोहोचला. नेमका काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी एसटी कर्मचारी तेथे गेले.
Banned Tobacco worth Rs 1 crore seized : प्रतिबंधित तंबाखूची तस्करी उधळली
तेथे त्या युवकाचा धुमाकूळ सुरू होता. यावेळी चौकीत कर्तव्यावर असलेला पोलिस कर्मचारी हजर नव्हता. तो बसस्थानक परिसरात फिरत असताना ही घटना घडली. तोडफोड करणाऱ्या युवकाला ताब्यात घेऊन अवधूतवाडी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. प्रफुल्ल गजानन साखरकर (२८) रा. चापडोह असे त्याचे नाव आहे.
Ravikant Tupkar : रविकांत तुपकर यांनी अधिकाऱ्यांना फोडला घाम !
बसस्थानक परिसरात कायद्याचा धाक राहिलेला नाही. दिवसाढवळ्या तेथे चोरीच्या घटना घडतात. दारूच्या नशेत वादावादीचे प्रकार नेहमीच होतात. आता थेट पोलिस चौकीवरच दारूच्या नशेत हल्ला चढविण्यात आला. त्यामुळे येथे येणाऱ्या सामान्य प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस व एसटी महामंडळ प्रशासनाकडून केवळ सतर्कतेच्या सूचना ध्वनिक्षेपकावरून दिल्या जातात. या व्यतिरिक्त कुठलीही ठोस कारवाई करण्यात येत नाही. यामुळे परिसरातील वातावरण आणखी बिघडत चालले आहे.








