व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण महायुतीचे किरण सरनाईक विजयी, काँग्रेसच्या अदिती पोहरे यांचा पराभव

महायुतीचे किरण सरनाईक विजयी, काँग्रेसच्या अदिती पोहरे यांचा पराभव

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात अखेरच्या २४ व्या बाद फेरीत मतांचा कोटा पूर्ण;

Amravati विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा अखेरच्या २४ व्या बाद फेरीत पूर्ण केला. त्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रा. अदिती पोहरे यांचा पराभव केला. या निवडणुकीत पहिल्या फेरीपासूनच सरनाईक यांनी आघाडी कायम ठेवली होती.

मंगळवारी सकाळी ८ वाजता सुरू झालेली मतमोजणीची प्रक्रिया तब्बल ३० तासांनंतर पूर्ण झाली. पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी केल्यानंतर विजयासाठी आवश्यक असलेला मतांचा कोटा पूर्ण न झाल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली. या प्रक्रियेत २४ बाद फेऱ्यांनंतर सरनाईक यांनी विजयासाठी आवश्यक असलेला १६ हजार १३४ मतांचा कोटा पूर्ण केला.

किरण सरनाईक भक्कम आघाडीसह विजयाच्या दिशेने

अखेरच्या २४ व्या बाद फेरीनंतर किरण सरनाईक यांना एकूण १६ हजार ६६३, तर प्रा. अदिती पोहरे यांना ८ हजार ६३६ मते मिळाली. या फेरीत सरनाईक यांनी विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण केल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना विजयी घोषित केले. डॉ. श्रीकांत देशपांडे हे अखेरच्या बाद फेरीत स्पर्धेतून बाहेर पडले.

यापूर्वीच्या कार्यकाळातही किरण सरनाईक यांनी याच मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळविला होता. यंदाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांनी पुन्हा विजय मिळवित मतदारसंघावरील आपले वर्चस्व कायम राखले.

error: Content is protected !!