Breaking

Caste wise census : जातिनिहाय जनगणना म्हणजे सामाजिक न्याय, हक्काची पुनर्स्थापना !

National OBC Federation felicitates MLA Dr. Parinay Phuke : लढ्याचा एक भाग झालो, ही गौरवाची बाब

Nagpur : केंद्र सरकारने जातिनिहाय जनगणनेचा ऐतिहासीक निर्णय घेतला. यामागे गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक लोकांनी मोठा लढा दिला आहे. ओबीसी चळवळीतील अनेकांचे यामध्ये योगदान आहे. आमदार डॉ. परिणय फुके यांनी सातत्यापूर्ण पाठपुरावा करत लढ्याला दिशा दिली. प्रसंगी सरकारशीही दोन हात करण्याची तयारी दर्शवली. या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर ओबीसी समाजात आनंदाचे वातावरण आहे. आमदार डॉ. फुके यांच्या नागपुरातील निवासस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात हा सत्कार करण्यात आला. जातिनिहाय जनगणना ही केवळ माहिती संकलनाची प्रक्रिया नाही, तर समाजिक न्याय आणि हक्कांची पुनर्स्थापना आहे. समतेच्या तत्वांची खरी अंमलबजावणी आहे, असे डॉ. फुके सत्काराला उत्तर देताना म्हणाले.

Congress : नृसिंहाप्रमाणे ईव्हीएममधून नवा अवतार भाजपला नष्ट करेल !

या निर्णयामुळे ओबीसी समाजाला खऱ्या अर्थाने योजनांचा फायदा होणार आहे. हा समाजाच्या दीर्घ संघर्षाचा गौरव आहे. या लढ्याचा मी एक भाग होतो, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. या लढ्यात जिद्द, मेहनत, चिकाटी, सातत्य आणि एकत्रितपणा मोलाचा ठरला. हा निर्णय ओबीसी समाजासाठी मैलाचा दगड ठरेल, यात तिळमात्र शंका नाही, असेही डॉ. फुके म्हणाले.

Our government : सेवा शुल्क वाढले, ‘आपले सरकार’चा वापर कमी होणार !

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे केंद्रीय सचिव शरद वानखडे, परमेश्र्वर राऊत, विनोद इंगोले, सुभाष घाटे, गुनेश्र्शवर आरीकर, राहुल करांगळे, अनिल चानपूरकर, लीलाधर दाभे, वीरश्री चानपूरकर, अफसाना पठाण, सुरेश जिचकार, राहुल खैरकर, घनश्याम मांगे, सुरेश कोंगे, रंगराव गेचोडे, राजेश भुते, विनायक इंगळे, गणेश नाखले, गणेश गडेकर, अविनाश घागरे, सौरभ राऊत, विका कैकाडे, अरूण कैकाडे सत्कार कार्यक्रमाला उपस्थित होते.