Gram Panchayat member ineligible : सरकारी जमिनीवरील डल्ला संजय जमधाडे यांच्या अंगलट
Buldhana डोणगाव ग्रामपंचायतीचे सदस्य संजय जमधाडे यांचे सदस्यत्व तीन अपत्यांची अट आणि शासकीय ई-क्लास जमिनीवरील अतिक्रमण या मुद्द्यांवरून रद्द करण्यात आले. २२ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय जाहीर केला. हा आदेश संबंधितांना ६ मे राेजी प्राप्त झाला.
संजय जमधाडे यांच्याविरोधात अमोल धोटे, नीलेश सदावर्ते, साजन शहा अब्दुल शहा आणि ज्योती बुरखंडे यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, जमधाडे यांनी ३ अपत्य असतानाही सदस्यपद मिळवले आणि शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून ती विकली. नंतर तक्रार मागे घेण्याचा प्रयत्न झाला, मात्र फक्त दोन तक्रारदारच प्रत्यक्ष हजर राहिल्याने शंका निर्माण झाली.
दत्तक सांगितले, पण अपत्य असल्याचे सिद्ध
जमधाडे यांनी बचावात सांगितले की, त्यांनी एक मुलगी भावाला दत्तक दिली आहे. मात्र पडताळणीअंती संबंधित मुलगी त्यांचीच असल्याचे स्पष्ट झाले. शिवाय त्यांच्या रेशन कार्डवरही तीन अपत्यांची नोंद आढळून आली.
Buldhana Police : साहेब, संसार उध्वस्त झाला, आता तरी दारूबंदी करा!
अतिक्रमणाचा आरोप ठोस; गाळा बांधून विक्री
तक्रारीत सांगितल्याप्रमाणे, संजय जमधाडे यांनी शासकीय ई-क्लास जमिनीवर गाळा बांधला आणि तो परस्पर विकला, याचे पुरावे प्रशासनाकडे सादर करण्यात आले होते.
तक्रारदार अनुपस्थित; तरी निर्णय झाला कठोर
१० फेब्रुवारी रोजी काही तक्रारदारांनी टपालाद्वारे तक्रार मागे घेण्याचा अर्ज दाखल केला होता. त्यानंतर १७ मार्च रोजी सुनावणीसाठी फक्त दोन अर्जदार हजर राहिले, त्यामुळे तक्रार मागे घेण्याच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले. अखेर, उपलब्ध पुराव्यांच्या आधारेच जमधाडे यांना दोषी ठरवून अपात्र ठरविण्यात आले.
Gharkul scheme : धोरणांचे मजले बांधले, पण घरकुलासाठी वाळू नाही!
अपील की निवडणूक?
संजय जमधाडे अपिलात जातील का, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीस अवघे सहा महिने शिल्लक असल्याने पुनर्निवडणुकीवरही साशंकता निर्माण झाली आहे.