Gadkari’s in-principle approval of ‘Cable Car’ in Mumbai : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
New Delhi : मुंबईतील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी केबल कारची नितांत गरज आहे. पण त्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरींची परवानगी लागणार आहे, असं महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले होते. सरनाईक यांनी दिल्ली येथे गडकरींची भेट घेऊन प्रस्ताव सादर केला. त्याला गडकरींकडून तत्वतः मान्यता मिळाली आहे.
Chandrashekhar Bawankule : पालकमंत्रीपदाचा निर्णय दोन दिवसांत !
मुंबई महानगर क्षेत्रामध्ये भविष्यात रोप वे च्या माध्यमातून केबल कार प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव आहे. त्याला नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. लवकरच या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा (D.P.R.) तयार करण्यात येईल. तसे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक मंत्रालयाचे सचिव व्ही. उमाशंकर यांना दिले आहेत, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.
नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीदरम्यान परिवहन मंत्री सरनाईक यांनी गडकरी यांची विशेष भेट घेतली. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये केबल कार प्रकल्प राबवण्यासाठी केंद्र सरकारने सहकार्य करावे, अशी विनंती केली. पर्वतमाला परियोजनेमध्ये हा प्रकल्प समाविष्ट करण्याचा प्रस्ताव दिला.
Backlog of Vidarbha : वैधानिक विकास मंडळाच्या मुदतवाढीचे काय झाले?
सार्वजनिक खाजगी भागीदारी (PPP) अथवा केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त आर्थिक भागिदारीने रोप वे विकसित करण्याच्या प्रकल्पाचे सादरीकरण केले. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईच्या एकूणच वाहतुकी संदर्भात प्रकल्प अहवाल सादर करा, असे सांगितले. त्याचवेळी विमानतळापासून उपनगरांमध्ये कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी कमीत कमी वेळ लागावा. अशा पद्धतीची एकत्रित वाहतूक व्यवस्था विकसित करण्याचा प्रकल्पाचेदेखील सर्वेक्षण करावे. अशी सूचना गडकरींनी केली.
सरनाईक यांनी वेगवेगळ्या उपनगरांमधून कमीत कमी वेळात मुंबई विमानतळाला पोहोचता येईल. असा एकत्रित वाहतूक आराखडा लवकरच सादर केला जाईल असे आश्वासन दिले.