Breaking

Uday Samant : टेक्सटाईल उद्योजकांसाठी खुशखबर; एक वर्षासाठी जमिनीचे दर कमी

 

Textile park gets momentum: Land prices reduced for one year : उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती; रोजगाराच्या नव्या संधींना चालना

Amravati पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कमध्ये उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच अधिकाधिक उद्योग या ठिकाणी उभारले जावेत यासाठी येथील जमिनीचे दर एक वर्षासाठी मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आले आहेत. सुरुवातीला हे दर १५६० रुपये प्रति चौ. मीटर होते, मात्र आता हे दर ६०० रुपये इतके निश्चित करण्यात आले आहेत. अशी माहिती उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी अमरावतीत दिली.

जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले मंत्री सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत उद्योजकांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव यांच्यासह उद्योग विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सामंत म्हणाले, “पार्कमध्ये आतापर्यंत पाच उद्योजकांनी १३०० कोटी रुपयांचे करार केले आहेत. मात्र, उच्च दरामुळे अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे आता एक वर्षासाठी जमिनीचे दर ६०० रुपये प्रति चौ. मीटर इतके निश्चित करण्यात आले आहेत.”

Operation Sindoor : पठाणकोटमध्ये अकोटचे ४० नागरिक अडकले

त्याचबरोबर सामाईक सुविधा शुल्क ६७ रुपये ठेवण्यात आले असून, पूर्वी जास्त दर भरलेल्यांना ५० टक्के सवलतीसह प्रलंबित रक्कम भरावी लागणार आहे. “या टेक्सटाईल पार्कमुळे १० हजार ते ५० हजारांपर्यंत रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता आहे,” असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

यासोबतच अमरावतीत आयटी पार्क, लघू-मध्यम उद्योग पार्क, एमएससीबी पार्क उभारण्यात येणार असून, आमझरी हे ‘मधाचे गाव’ म्हणून विकसित केले जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

DCM Eknath Shinde : शिंदेंचा टोला; नेते युरोपात, कार्यकर्ते कोमात

गुरुकुंज मोझरी होणार पुस्तकांचे गाव

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज मोझरी येथे राज्यातील चौथे पुस्तकांचे गाव उभारले जाणार आहे. “या उपक्रमात ३५ कुटुंबांचा समावेश राहणार असून, येथे दुर्मीळ व दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिली जातील,” अशी माहितीही सामंत यांनी दिली. तसेच, “मराठी भाषा विद्यापीठात येत्या शैक्षणिक सत्रापासून अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत,” असेही ते म्हणाले.