Breaking

Kharif season : खरीप तोंडावर, कृषी सहायक संपावर!

Agricultural assistants warn of indefinite strike from May 15 : प्रलंबित मागण्यांकडे सरकाचे दुर्लक्ष; १५ मेपासून बेमुदत संपाचा इशारा

Akola महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार, ५ मेपासून राज्यभरात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यातही या आंदोलनाला प्रतिसाद मिळत आहे. कृषी सहाय्यकांनी संघर्षाची भूमिका घेतली आहे.

संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये ‘कृषी सेवक’ कालावधी रद्द करून थेट नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देणे, कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून ‘सहायक कृषी अधिकारी’ करणे, शासकीय कामकाजासाठी प्रत्येक कृषी सहाय्यकाला लॅपटॉप देणे, तसेच ग्रामस्तरावर मदतनीस उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे.

Crop Insurance : पाच तास आंदोलन, त्यानंतर अधिकाऱ्यांचे आश्वासन!

५ मेपासून आंदोलन टप्प्याटप्प्याने पुढे नेत, सोमवारी काळ्या फिती लावून काम करण्यात आले. त्यानंतर ७ मे रोजी जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी कार्यालयांपुढे धरणे आंदोलन करण्यात आले. ८ मेपासून ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार, तर १५ मेपासून सर्वच कामकाजावर बहिष्कार आणि बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

NCP Ajit Pawar : ४० वर्षे रिपाईचे काम केले, आता अजितदादांच्या राष्ट्रवादीत!

या आंदोलनात अकोला जिल्ह्यातील सर्व कृषी सहाय्यक आणि पदाधिकारी सहभागी झाले आहेत. बुधवारी झालेल्या धरणे आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र राठोड, जिल्हा उपाध्यक्ष निलेश करसकार, अकोला तालुकाध्यक्ष संतोष मुळे, महिला प्रतिनिधी दिपाली अटमबर, वैशाली इंगळे, मेघा नागे, शालिनी निखाडे, रेणुका टाके, तसेच अशोक करवते, नितेश घाटोळ, प्रणित बंड, साहेबराव राठोड, कल्पना उमक, आदित्य सदार, अजय देशमुख, मंगेश पवार, प्रदीप हगवणे, सुशील कोकाटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.