Nagpur Police : पोलीस कोठडीत चाकू भोसकून घेतला !

Got stabbed with a knife Attempted suicide in police custody : आरोपीने केला आत्महत्येचा प्रयत्न

Nagpur Police चोरी प्रकरणातील एका आरोपीला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. चोरीबाबत चौकशी सुरु असतानाच आरोपीने ड्रॉव्हरमधील चाकू काढला. आणि स्वत:च्या पोटात भोसकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला. त्यामुळे तातडीने आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रज्ज्वल शेंडे (२२, इंदोरा) असे आरोपीचे नाव आहे. प्रज्ज्वल हा कुख्यात चोर आहे. त्याच्यावर आतापर्यंत २८ गुन्हे दाखल आहेत. तो नेहमी पोलिसांच्या नाकावर टिच्चून घरफोड्या करायचा. त्याला यापूर्वी काही गुन्ह्यांत अटक झाली होती. सोमवारी रात्री तो जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करण्याच्या तयारीत होता. मात्र, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांच्या पथकाच्या दृष्टीस पडला. पोलिसांना पाहून तो पळायला लागला. पोलिसांनी त्याला शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले.

A boon for farmers : शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार ई-हक्क प्रणाली !

त्याला चांगला चोप दिल्यानंतर रात्रीच्या सुमारास जरीपटका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. जरीपटका पोलिसांनी त्याला रात्रभर पोलीस कोठडीत ठेवले. मंगळवारी सकाळी ११.३० वाजता त्याला चौकशी करण्यासाठी कोठडीतून बाहेर काढले. तपास पथकाच्या खोलीत (डीबी) त्याला ठेवण्यात आले. त्याला बाजीराव पट्ट्याने प्रसाद देण्यात आला. चिडलेल्या प्रज्ज्वल एका कोपऱ्यात शांतपणे बसला.

मात्र, डीबी पथकातील दोन्ही कर्मचारी खर्रा खाण्यात मग्न होते. त्यावेळी बाजुला असलेल्या टेबलाच्या ड्राव्हरमधील चाकू घेतला. पँटच्या खिशात लपवला. काही वेळाने आणखी दोन पोलीस कर्मचारी तेथे आले. त्यांनी प्रज्ज्वलला घरफोडीतील मुद्देमालाविषयी विचारणा केली. काही वेळातच प्रज्ज्वलने चाकू काढला आणि स्वत:च्या पोटात भोसकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Married couple committed suicide on their wedding anniversary : नातेवाईकांना फोन करून विचारपूस केली मग गळफास घेतला !

त्याच्या पोटातून रक्त वाहू लागताच पोलीस कर्मचाऱ्यांचे लक्ष गेले. त्यांनी लगेच वरिष्ठांना माहिती दिली. प्रज्ज्वलला रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याच्यावर आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.