Breaking

India – Pakistan : ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही, काय म्हणाले परराष्ट्र मंत्री ?

Operation Sindoor is not over, what did External Affairs Minister S. Jaishankar say? : ..तर भारत पुन्हा जसाश तसे उत्तर देईल

New Delhi : ऑपरेशन सिंदूर राबवून भारताने पाकिस्तानचे कंबरडे मोडले. तरीही पाकिस्तानकडून फुसक्या धमक्या देणे सुरू आहे. पाकिस्तानी सेनेचा दहशतवाद्यांशी संबंध सिद्ध झाला आहे आणि आम्हाला पाकिस्तानातील दहशदवाद्यांच्या अड्ड्यांची पूर्ण माहिती आहे. भारतावर पुन्हा हल्ला झाल्यास भारत जसाश तसे उत्तर देईल, असा इशारा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी एका माध्यमाशी बोलताना दिला आहे.

पाकिस्तानने केलेल्या विनंतीवरून तीन दिवस चाललेल्या युद्धानंतर शस्त्रसंधी झाली असली तरी दोन्ही देशांचे एकमेकांवर अधुनमधून हल्ले सुरूच आहेत. दरम्यान ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही, सुरूच आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी हल्ले केले तर भारत हल्ले करून दहशतवाद्यांना लक्ष्य करेल, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. पाकिस्तानी सैन्य दहशतवादात गुरफटले आहे. पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी यांना आता वेगवेगळं समजता येणार नाही. एस. जयशंकर यांच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानच्या पायाखालची वाळू निश्चितच सरकणार आहे. त्यामुळे आतातरी पाकिस्तानने कुरापात्या थांबवल्या पाहिजे.

Nationalist Congress Party : काल पटेलांनी फटकारले, आता दादा घेणार क्लास !

पाकिस्तानी सेना आणि सरकार दहशतवाद्यांसोबत मिळालेले आहेत. प्रतिबंधित करण्यात आलेले दहशतवादी पाकिस्तानातच आहेत. दिवसाढवळ्या वावरत आहेत आणि आपल्या कारवाया करतच आहेत. याची इत्यंभूत माहिती आम्हाला आहे. त्यांच्या एक – एक हालचालींवर आमची करडी नजर आहे. १९४८ पासून जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शांतता भंग करून वातावरण खराब केले जात आहे. त्यांनी परत हल्ला केल्यास आम्ही त्यांना घरात घुसून मारू, असेही एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.