Breaking

MLA Randhir Sawarkar : शेतमालाच्या किमतीत दुपटीहून अधिक वाढ

The government more than doubled the prices of agricultural products : आमदार रणधीर सावरकर यांचा दावा; आकडेवारीचा दिला दाखला

Akola सन २००४-०५ ते २०१३-१४ या काँग्रेसच्या सत्ताकाळातील शेतमालाच्या आधारभूत किमतींची तुलना केली असता, २०१४ नंतरच्या नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी सरासरी दुपटीहून अधिक दरवाढ दिली आहे, असा दावा आमदार रणधीर सावरकर यांनी आकडेवारीसह प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

सन २०२५-२६ साठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या शेतमालाच्या आधारभूत किमती आणि २०१३-१४ सालातील दरांची तुलना करण्यात आली आहे. त्यासाठी आकडेवारी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Central Judicial Authority : पोलीस अधिक्षकांची बदली हा मनमानी कारभार!

अनेक पिकांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून काही पिकांमध्ये ही वाढ १०० टक्क्यांहून जास्त आहे. विशेषतः रागी, तीळ, नायजर, कापूस आणि सोयाबीन यांसारख्या पिकांमध्ये ही वाढ लक्षणीय आहे.

“ही वाढ केवळ आकड्यांची नाही, तर शेतकऱ्यांच्या जगण्याच्या आशेची आहे. मोदी सरकारच्या धोरणांमुळेच आज शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य मूल्य मिळू लागले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांचे खरे हित पाहणारे सरकार महायुती व एनडीएचेच असल्याचे या आकडेवारीतून सिद्ध होते,” असे मत आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केले.

Local Body Elections : सर्कल रचनेसाठी राजकीय पक्षांत रस्सीखेच

पीक 2025-26 दर (₹/क्विंटल) 2013-14 दर (₹/क्विंटल) वाढ (₹) टक्केवारीने वाढ

धान्य
रागी 4886 1500 3386 226%
मका 2400 1310 1090 83%

डाळी
तूर/अरहर 8000 4300 3700 86%
मुग 8768 4500 4268 95%
उडीद 7800 4300 3500 81%

PWD Maharashtra : थकीत देयकांमुळे संतप्त कंत्राटदार आक्रमक!

तेलबिया
भुईमुग 7263 4000 3263 82%
सूर्यफूल 7721 3700 4021 109%
सोयाबीन (पिवळा) 5328 2560 2768 108%
तीळ 9846 4500 5346 119%
नायजर 9537 3500 6037 172%

व्यावसायिक पिके
कापूस (मध्यम) 7710 3700 4010 108%
कापूस (लांब) 8110 4000 4110 103%