Was in Congress for forty years, now will join NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश, चाळीस वर्षांची साथ सोडली
Khamgao काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी पक्षातील सर्व पदांचा तसेच सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे खामगावच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
१९८५ पासून काँग्रेसमध्ये सक्रिय असलेले सानंदा हे तीन वेळा आमदार राहिले असून, पक्षाने त्यांना पाच वेळा उमेदवारी दिली. त्यांनी पक्षनिष्ठा कायम ठेवत अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. मात्र अलीकडच्या काळात पक्षातील अंतर्गत कारभार, विशेषतः २०२५ च्या निवडणुकीतील निर्णयांवरून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पक्षप्रवेशासाठी जोरदार तयारी
दिलीपकुमार सानंदा हे १२ जून रोजी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून, या कार्यक्रमात जोरदार शक्तीप्रदर्शन होणार आहे. या वेळी ५ हजार छत्र्या आणि २० हजार घड्याळींचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आठ मंत्र्यांची उपस्थिती राहणार आहे.
Maha Politics : नितेश राणे आपल्या वक्तव्यावर ठाम; म्हणाले, ईद इको फ्रेंडलीच झाली पाहिजे !
राजीनाम्यातील आरोप गंभीर
सानंदा यांनी आपल्या राजीनाम्यात स्पष्ट केले आहे की, खामगावमधील ‘सद्भावना संकल्प सभा’ अशा व्यक्तींच्या हातात देण्यात आली, ज्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाजप उमेदवारासाठी काम केले. या संदर्भात स्थानिक काँग्रेस अध्यक्षांनी तक्रार दाखल केली होती, तरीदेखील कुठलीही कारवाई न झाल्याने पक्षातील शिस्त व समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत, असे त्यांनी नमूद केले.
Shiv Sena Eknath Shinde : स्थानिक निवडणुका गायकवाड यांच्या नेतृत्वात?
राजकीय उलथापालथीला सुरुवात?
सानंदा यांच्या राजीनाम्याची प्रत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नेत्यांपासून ते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांपर्यंत अनेक नेत्यांकडे पाठवण्यात आली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीतील असंतोष पुन्हा उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.