Police brutally beat up : कट मारल्याचे कारण देत पोलिसांची एकाला बेदम मारहाण
Gondia: गाडीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून, मद्याच्या नशेत ‘टल्ली’ झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने भर चौकात दादागिरी करत एकाला बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे संबंधित पोलिसाला निलंबित करण्यात आले आहे.
गाडी ओव्हरटेक करून कट मारल्याचा आरोप करत एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने, गोंदियातील भर चौकात एकाला बेदम मारहाण केली. या प्रकारात त्या व्यक्तीचे कपडे फाटे पर्यंत ही मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
महाराष्ट्र पोलीस दलातील जनतेच्या रक्षणासाठी असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांचे हे कृत्य हे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. संबंधित कर्मचाऱ्याचा त्या व्यक्तीला बेदम मारहाण करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल. यासंदर्भात मार पडलेल्या त्या व्यक्तीने गोंदिया पोलिसांकडे तक्रार केल्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मारहाण करणाऱ्या त्या पोलीस शिपायाला निलंबित केल्याची माहिती समोर येत आहे.
Request made after receiving funds : भाजपचे वरातीमागून घोडे, निधी मिळाल्यावर केली मागणी !
पोलीस शिपायाची कृत्य व्हायरल व्हिडिओ मुळे पुन्हा चर्चेत आले आहे सोबतच पोलीस विभागाच्या कार्यावर प्रश्न निर्माण करत आहे गोंदिया जिल्ह्यातील डूग्गीपार पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेल्या कांचन राहुले या पोलिसाचा हा व्हिडिओ असल्याचे समोर येत असून ही घटना काही दिवसांपूर्वीची आहे. पोलिसाचे हे कर्तृत्व समाज माध्यमावर व्हायरल झाल्यावर हा प्रकार समोर आल्याचे सांगितले जात आहे.
शेजारीच असलेल्या छत्तीसगड राज्यातील सुनील कुमार माडावी यांनी कट मारून गाडी उमटेक केल्याचा आरोप करत, राहुल यांनी सुनील कुमारला भर चौकात कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली. मारहाणीचा हा प्रकार कोणीतरी व्हिडिओ मध्ये चित्रित केला आणि नंतर काही दिवसांनी तो व्हायरल केला. आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला.
Rahul gandhi : बावनकुळे यांच्या मतदारसंघात अचानक इतके मतदार वाढले कसे ?
मात्र घटने नंतर सुनील कुमार यांनी या घटनेबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. यावर गोंदिया पोलिसांनी कारवाई करत राहुले याला निलंबित केले आहे. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही, असे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.