Eknath Shinde’s Shiv Sena, which broke Balasaheb’s Shiv Sena, split in Akola : भाजपच्या वर्चस्वासंबंधी तीव्र नाराजी
Akola :स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री हे भाजपसोबत सत्तेत बसले. पण त्यांनी जे केले, त्याचेच प्रत्यंतर आता त्यांना अकोला जिल्ह्यात येत आहेत. अकोला जिल्ह्यात त्यांची शिवसेना फुटली आणि दोन गट तयार झाले. आता हे दोन गट एकमेकांची सावलीही बघायला तयार नाहीत, इतकी परिस्थिती विकोपाला गेली आहे.
अकोला येथे शिवसेनेच्या शिंदे गटात अंतर्गत वाद उफाळून आल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार गोपिकिशन बाजोरीया व जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर – अश्विन नवले या दोन गटांमध्ये वाढत्या मतभेदांमुळे आता वेगवेगळ्या बैठकांचे आयोजन केले जात आहे. आगामी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बाजोरीया गटाचा मेळावा शनिवारी (७ जून) घेण्यात आली. तर पिंजरकर-नवले गटाची बैठक आज रविवारी (८ जून) घेण्यात येत आहे.
policeman whobullied was suspended:’टल्ली ‘ होऊन दादागिरी करणारा तो पोलीस निलंबित
२३ मे रोजी पार पडलेल्या आढावा बैठकीत भाजपच्या वर्चस्वासंबंधी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. काही पदाधिकाऱ्यांनी ‘बाजोरीया हटाव, शिवसेना बचाव’ अशा घोषणा दिल्या होत्या. या बैठकीनंतर बाजोरीया यांचे छायाचित्र असलेले फलक काही शिवसैनिकांनी दोन ठिकाणी जाळल्याची घटना घडली होती. त्यानंतर बाजोरीया समर्थकही आक्रमक झाले असून, फलक जाळणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पिंजरकर-नवले गटाची बैठक आज..
पिंजरकर-नवले गटाची बैठक रविवार, ८ जून रोजी दुपारी विश्रामगृहात होणार आहे. ही बैठक केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली जाणार आहे. या बैठकीत पक्ष संघटना, सदस्य नोंदणी, नियुक्त्या तसेच आगामी निवडणुकीच्या तयारीवर चर्चा होणार आहे.
बाजोरीया गटाच्या मेळाव्यात पक्ष प्रवेश..
दुसरीकडे, बाजोरीया गटाचा मेळावा शनिवारी, ७ जून रोजी जिल्हा परिषद कर्मचारी भवनात दुपारी १ वाजता पार पडला. या मेळाव्यात जिल्हा परिषद व महापालिका निवडणूक लढविण्याची इच्छा असलेल्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश करून घेण्यात आला. या कार्यक्रमाला गोपिकिशन बाजोरीया, जिल्हाप्रमुख नारायणराव गव्हाणकर, चंद्रशेखर पांडे, संतोष अनासने आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Request made after receiving funds : भाजपचे वरातीमागून घोडे, निधी मिळाल्यावर केली मागणी !
‘महानगर प्रमुख आम्हीच’ – नवले यांचा दावा..
महापालिकेच्या अकोला पूर्व व पश्चिम या दोन्ही विभागांचे महानगरप्रमुख आम्हीच असल्याचा दावा जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, अश्विन नवले व महानगराध्यक्ष योगेश अग्रवाल यांनी केला आहे. विरोधी गटाकडून पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असून, ही बाब पक्षश्रेष्ठींना पुन्हा कळवली जाणार असल्याचे नवले यांनी स्पष्ट केले आहे.