Breaking

Local Body Elections : जिल्ह्यातील ११ नगरपालिकांमध्ये नवे प्रभाग, इच्थुक लागले कामाला

New wards in 11 municipalities in Buldhana district : आघाडी-युतीमध्ये रंगणार सामना; जागांसाठी मित्रपक्षांमध्ये होणार चुरस

Buldhana स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्यासोबतच जिल्ह्यातील ११ नगरपालिकांमध्ये नवे प्रभाग तयार केले जाणार आहेत. राज्य शासनाने १० जूनला यासंदर्भात अधिसूचना जारी केल्यानंतर इच्छुकही जोरदार तयारीला लागले आहेत. आता या संपूर्ण रचनेमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीची गणीतं कशी बसतात, त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

नव्या रचनेनुसार बहुतेक नगरपालिकांमध्ये एक-एक प्रभाग राहणार आहे. त्यामध्ये दोन सदस्य असतील. तर केवळ एकाच ठिकाणी तीन सदस्य असतील, असे सूत्रांकडून कळते. ऑगस्टच्या शेवटी ही अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर निवडणुकीच्या कामांना खऱ्या अर्थाने वेग येणार आहे.

Nago Ganar : शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी फक्त नागपूरसाठी का?

या प्रक्रियेसाठी मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत स्थानिक अधिकाऱ्यांबरोबरच संगणक तज्ञ, नगररचनाकार व इतर अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. प्रस्ताव तयार झाल्यानंतर त्यास अंतिम मान्यता जिल्हाधिकारी देतील. या बदलांमुळे स्थानिक प्रतिनिधित्व अधिक प्रभावी व जनसंपर्क अधिक सक्षम होईल, असं शासनाचं म्हणणं आहे. त्यासोबतच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ असेल.

गेल्या दोन-दोन अडीच वर्षांपासून प्रतीक्षा करणाऱ्या इच्छुकांमध्ये या आदेशामुळे नवे चैतन्य आला आहे. सर्वच पक्ष आता निवडणुकीची तयारी सुरु करत आहेत. या बदलांमुळे स्थानिक राजकारण अधिक चळवळीत येणार असून जनतेचे प्रश्न अधिक चटपट मार्गी लागतील, असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

Plane Crash : विमानाच्या लोखंडाचे पत्रेही वितळले, पण भगवद्गीता सुखरूप; ‘हे’ आहे कारण !

जिल्ह्यातील सध्याची स्थिती असलेल्या नगरपालिकांमध्ये — बुलढाणा (१४), चिखली (१३), मलकापूर (१४), शेगाव (१४), नांदुरा (१२), जळगाव जामोद (९), खामगाव (१६), मेहकर (१२), देऊळगावराजा (८), सिंदखेड राजा (८) व लोणार (५) — एकूण ११ संस्था आहेत. या सर्वांमध्ये नवे बदल घडवण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणुकीचे चित्र अधिक चुरशीचे असणार आहे.