Breaking

Local Body Elections : दिलीप सानंदा राष्ट्रवादीत; समर्थक भाजपमध्ये!

Dilip Sananda joined NCP, but supporters joined BJP : मंत्री आकाश फुंडकरांचा मास्टरस्ट्रोक; निवडणुकीत फटका बसणार

Buldhana काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच त्यांना घरातील असंतोषाचा मोठा फटका बसला आहे. सानंदांवर विश्वास असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांची साथ सोडून थेट भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सानंदा एकटे पडण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.

खामगावचे आमदार व सानंदांचे कट्टर विरोधक मंत्री आकाश फुंडकर यांनी या घडामोडीत आक्रमक चतुराईने पुढाकार घेतला. त्यांनी सानंदांचे विश्वासू असलेल्या अनेक नेत्यांना भाजपमध्ये आणण्यात उल्लेखनीय यश मिळविले आहे. अकोला येथे झालेल्या “विकास संवाद सभेत” काँग्रेसचे माजी जि. प. अध्यक्षा वर्षाताई वनारे यांचे पती व माजी बांधकाम सभापती सुरेश वनारे, माजी सभापती सुरेशसिंह तोमर, जलंबचे सरपंच मंगलताई घोपे, माजी सरपंच भरतसिंह चव्हाण, आशिष देशमुख, मधुकरसिंह तोमर, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष बबलु नरवाडे, नागेश बोराडे, अनिकेतसिंह तोमर आदी असंतुष्ट नेत्यांनी अधिकृतरीत्या भाजपमध्ये प्रवेश केला.

Nagpur Municipal corporation election : मनपा निवडणुकीत भाजप पाळणार नाही ‘महायुतीचा धर्म’?

या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण व माजी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्वतः उपस्थित राहून सर्वांचे पक्षात स्वागत केले. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. पण त्याचवेळी दिलीप सानंदांच्या विरोधातच ही खेळी असल्याचे संकेतही दिले.

Zilla Parishad Nagpur : पती-पत्नी एकत्रीकरणात प्रशासनाचा खोडा, शिक्षकांना मनःस्ताप

या घडामोडींमुळे बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळ अधिकच ढवळून निघाले आहे. सानंदांवरील विश्वासाचा पाया ढासळत असलेल्या स्थितीत आकाश फुंडकर अधिक मजबूत झाल्याचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचला आहे. या पक्षांतरांमुळे आगामी निवडणुकीत चांगलीच चुरस रंगणार आहे. सानंदा व भाजपचे उमेदवार एकमेकांसमोर ताकद अजमवण्यात हरवतील असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.