Breaking

Buldhana Zilla Parishad : जिल्हा परिषदेत एक गट; दोन गण वाढणार!

A new political picture may arise in Buldhana : बुलढाण्यात नवे राजकीय चित्र बघायला मिळणार

Buldhana सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. त्यातच राज्य शासनाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे नवे प्रभाग व मतदारसंख्या निश्चित केली आहे. या बदलांमुळे जिल्हा परिषदेचे एक गट अधिक असणार असून दोन गणांची भर पडणार आहे. त्यामुळे आता एकूण ६१ सदस्य असतील.

ग्रामविकास विभागाने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या सूचनेनुसार ही नवी रचना २०११ च्या जनगणनेवरील लोकसंख्येच्या आधारे असणार आहे. त्यानुसार पंचायत समित्यांमधील एकूण गणांची संख्या १२२ असणार आहे. विशेषत: मेहकर तालुक्यात एक गट वाढवण्यात आला आहे. शेगावमध्ये एक गट वजाबातीला जाईल. त्यासोबतच मोताळा व मलकापूर या तालुक्यातदेखील बदल होतील.

Buldhana Zilla Parishad : ग्रामपंचायतींच्या कारभारावर जिल्हा परिषदेचे लक्ष!

जिल्हा परिषदेचे नवीन चित्र अंतिम करत असताना हरकती व अभिप्रायांकरिता १४ जुलैपर्‍यंत वेळ दिला जाईल. त्यानंतर २१ जुलैपर्‍यंत हरकती व सूचनांवरील सुनावणी करण्यात येईल. २८ जुलैपर्‍यंत अभिप्राय एकत्र केले जाईल व १० ऑगस्टपर्‍यंत अंतिम प्रस्ताव तयार करण्यात येईल. १८ ऑगस्टपर्‍यंत अंतिम आरक्षणासह प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास सादर केला जाईल.

या बदलांमध्ये जनगणनेनुसार अनुसूचित जातीचे (१९.६४%) व जमातीचे (५.७२%) प्रतिनिधित्वदेखील विचारात घेतले गेले आहे. गट व गणांची अंतिम व्यवस्था करताना या घटकांनाही योग्य स्थान दिले गेले आहे. महाविकास आघाडीचे सरकार असतानाचा ६० वरून ६८ केलेला गटसंख्या आदेश आता रद्द करण्यात आला आहे. २०१७ च्या व्यवस्था लागू असतील.

Nagpur Municipal Corporation : नागपुरात कचरासंकट, कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा संप!

या बदलांमुळे मेहकर, मोताळा व मलकापूर या तालुक्यात चढाओतार होतील, तर २०२२ च्या निवडणुकीचे जे प्रस्ताव तयार केले गेले होते, त्यांनासुद्धा आता नव्याने तयार केले जाणार आहेत. एकंदरीत सप्टेंबर-ऑक्टोबरपर्‍यंत निवडणुकीचे वादळ घोंगवू लागण्याची चिन्हे आहेत.