Ex-MLA disqualified from District Cooperative Bank President post : विभागीय सहनिबंधकांचा आदेश; राजकारणात खळबळ
Amravati जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अध्यक्ष बच्चू कडू यांना संचालक पदावरून अपात्र करण्याचा आदेश विभागीय सहनिबंधकाने दिला आहे. गुरुकुंज मोझरी येथे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीसाठी सात दिवस अन्नत्याग आंदोलन केले असताना कडू अस्वस्थ झाल्याने त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशातच हा आदेश आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कडू यांनी काँग्रेसचे वर्चस्व संपवून बँकेचे अध्यक्षपद मिळविले होते. त्यानंतर अध्यक्षपद मिळविल्याने काँग्रेसचे पदाधिकारी व बँकेचे संचालक यांनी विभागीय सहनिबंधकांकडे त्यांना अपात्र ठरविण्याचा अर्ज केला होता. नाशिक जिल्हा न्यायालयाने एका खटल्यात त्यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर विभागीय सहनिबंधक चैतन्य नासरा यांनी आदेश पारित करत बच्चू कडू यांना पाच वर्षांसाठी जिल्हा बँकेचे संचालक होण्यास अपात्र केले.
Rural Development Ministry : १२,४९६ सरपंचपदे असणार महिलांसाठी आरक्षित
विभागीय सहनिबंधक यांनी ७ फेब्रुवारी रोजी नोटीस पाठवून २४ फेब्रुवारी रोजी सुनावणीस हजर राहण्यास आदेश दिले होते. ९ मे रोजी सुनावणी झाली असता दोन्ही पक्षांनी आपापल्या भूमिका मांडल्या. या सुनावणीनंतर चैतन्य नासरा यांनी आदेश पारित करत बच्चू कडू यांना जिल्हा बँकेचे संचालक असण्यास अपात्र ठरविले.
असे आहे प्रकरण
जिल्हा बँकेत बबलू देशमुख गटातील हरिभाऊ मोहोड सहित ११ संचालकांनी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना अपात्र ठरविण्याचा अर्ज केला होता. नाशिक जिल्हा न्यायालयाने एका खटल्यात त्यांना एक वर्षाची शिक्षा दिली होती. बँकेच्या उपविधीनुसार एक वर्षांपेक्षा अधिक कारवास असलेल्या व्यक्तीला संचालक असण्यास अपात्र ठरविले जाते.
Republican Party of India : रिपब्लिकन पक्षाला सामाजिक संघटनांचा आधार!
गैरव्यवहार असलेल्या मंत्र्यांवर कारवाई होत नाही. अशात शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनाचा हवाला देत बच्चू कडू यांना अपात्र करण्याचा आदेश देण्यात येतो, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. शेतकरी प्रश्नांवर आंदोलने करणाऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असून ही कारवाई हुकूमशाहीचे उदाहरण असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.