American president repeated the same tone after Munirs meeting : मोदींनी स्पष्ट केले तरी, ट्रम्प यांचा हेका कायम, मुनीरच्या भेटीनंतर आळवला पुन्हा तोच सूर
New Delhi: मला पाकिस्तान आवडतो, भारत पाकिस्तानातील युद्ध मीच थांबवलं असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प सोबत फोनवर चर्चा करा आम्हाला कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही असे स्पष्ट केले होते पण पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुलींच्या भेटीनंतर ट्रम्प यांनी पुन्हा जुना सूर आळवला आहे.तसेच
मोदी खूप चांगले व्यक्ती आहेत. मी त्यांच्याशी बोललो. आम्ही लवकरच भारताशी करार करणार आहोत असेही त्यांनी सांगितले.
पहलगाम हल्ला व त्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत व पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेला एअर स्ट्राईक यानंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले होते. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर ड्रोन हल्ले करण्यात आले. भारतानं पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांसोबतच पाकिस्तानच्या काही हवाई तळांवरही हल्ले केले. यानंतर पाकिस्तानकडून शस्त्रविरामाच विनंती भारतानं मान्य केली. पण दोन्ही देशांमधलं युद्ध मीच थांबवलं, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. आता पुन्हा ट्रम्प यांनी तीच भूमिका मांडली आहे.
Shivendrasinghraje Bhosale : राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देणारे रस्ते बनवणार !
एकीकडे इस्रायल-इराण यांच्यातील युद्धात मध्यस्थी करण्याची जोरदार तयारी ट्रम्प यांनी चालवली असतानाच भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्ध मीच थांबवल्याचा दावा करायला ते विसरले नाहीत. मध्य-पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टनमध्ये प्रसारमाध्यमांनी ट्रम्प यांना आंतरराष्ट्रीय स्थितीबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ट्रम्प यांनी नुकतीच पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची भेट घेतली. त्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की,मला पाकिस्तान आवडतो. पण मोदी एक खूप चांगले व्यक्ती आहेत. मी त्यांच्याशी बोललो. आम्ही लवकरच भारताशी करार करणार आहोत.
आसीम मुनीर पाकिस्तानच्या बाजूने प्रभावी काम करत होते. भारताकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर काम करत होते. याशिवाय इतरही लोक प्रयत्न करत होते. त्या दोन्ही देशांमध्ये मोठा संघर्ष पेटला होता. शिवाय ते दोन्ही देश अण्वस्त्रधारी देश आहेत. मी ते थांबवलं. मी दोन मोठ्या अण्वस्त्रधारी देशांमधलं युद्ध थांबवलं. लोकांना माहिती आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला.
Maruti Chitampally : अरण्यऋषी विसावला ! मारूती चितमपल्ली यांचे निधन !
दरम्यान, बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान भारताची भूमिका स्पष्ट केली होती. ऑपरेशन सिंदूर हे शस्त्रविरामापर्यंत गेलं पण त्यात अमेरिकेची मध्यस्थी नव्हती, यापुढेही नसेल. भारत आणि अमेरिका व्यापार विषयक संबंध किंवा अमेरिकेने दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करणं याबाबत काहीही चर्चा झाली नव्हती. भारताने आधीही अमेरिकेची मध्यस्थी स्वीकारली नव्हती यापुढेही कधीच स्वीकारणार नाही, असं मोदींनी ट्रम्प यांना स्पष्ट केलं होतं. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली होती.