Focus on petition hearing of Disqualification : जिल्हा बँक अध्यक्ष अपात्र प्रकरण : विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयाला आवाहन
Amravati जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अपात्रतेच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. १९ जून रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. बच्चू कडू यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि संचालकपदासाठी अपात्र ठरविले आहे. हा निर्णय तत्कालीन विभागीय सहनिबंधक चैतन्य नासरे यांच्या न्यायालयाने दिला.
१६ जून रोजी तो निर्णय सार्वजनिक झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी कडू यांच्या वतीने बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी गुरुकुंज मोझरी येथे आठवडाभर अन्नत्याग आंदोलन केले होते. उपोषण सोडल्यानंतर त्यांना अमरावती येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
Marathi Vs Hindi: हिंदी सक्तीचा वाद सुरु असताना नव्या पुरस्काराची घोषणा
हॉस्पिटलमधूनच त्यांनी सहनिबंधकांच्या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे सांगितले होते. नाशिक येथे आंदोलनादरम्यान कामात अडथळा आणल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने त्यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. हाच आधार घेऊन विभागीय सहनिबंधकांनी त्यांना अपात्र ठरविले. मात्र, ही शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या एकल पीठाने ११ मार्च २०२५ पर्यंत निलंबित केली आहे. हाच मुद्दा घेऊन कडू यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.