Breaking

MLA Siddharth Kharat : शेतकऱ्यांना त्रास दिलात तर गाठ माझ्याशी; आमदारांचा महावितरणला इशारा

MLA warns Mahavitaran to improve its system : मेहकरची यंत्रणा अजगरासारखी सुस्त असल्याची खरात यांची टीका

Buldhana “मेहकर विधानसभा मतदारसंघातील वीज वितरण यंत्रणा ही अजगरा प्रमाणे सुस्त असून, शेतकऱ्यांना जर का त्रास दिला, तर ती गाठ थेट माझ्याशी येईल,” असा कडक इशारा आमदार सिद्धार्थ खरात यांनी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. ठेकेदारांच्या अनुपस्थितीवर संताप व्यक्त करत त्यांनी सौरऊर्जेसंदर्भातील तक्रारी विधानसभेत मांडण्याचाही इशारा दिला.

मेहकर येथील के.व्ही. प्राईड हॉटेलमध्ये घेण्यात आलेल्या वीजवितरण आढावा बैठकीत शेतकरी व नागरिकांनी तक्रारींचा पाऊस पाडला. मेहकर भाग २, डोणगाव भाग २, लोणी गवळी आणि सुलतानपूर या विभागांकडून सर्वाधिक तक्रारी आल्या, तर जानेफळ सेक्शनमधून केवळ एकच तक्रार दाखल झाली होती.

Mahayuti Government : अजितदादांच्या खात्यावर आता शिंदेंच्या मंत्र्यांचा ‘वॉच’

आमदार सिद्धार्थ खरात यांनी बैठकीत बोलताना स्पष्ट केले की, “३० एजन्सीज काम करत असताना फक्त तीन एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित असावेत, हे वीजवितरण व्यवस्थेतील ढिसाळपणाचे द्योतक आहे. संबंधित ठेकेदारांची स्वतंत्र बैठक घेऊन कठोर कारवाईचे निर्देश देण्यात येतील.” तसेच त्यांनी कार्यकारी अभियंता बद्रीनाथ जायभाये यांना रिक्त ४२ पदांच्या भरतीसाठी पाठपुरावा करण्यास सांगितले.दांड्या मारणाऱ्या आणि कामात हलगर्जी करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उचलण्यात येईल, असे आमदारांनी स्पष्ट करताना, “शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका,” असा सज्जड दम भरला.

Bacchu Kadu : बच्चू कडू पुन्हा उगारणार आंदोलनास्त्र; ५ जुलैपासून एल्गार

या बैठकीत शिवसेना (उबाठा) चे उपजिल्हाप्रमुख आशिष राहाटे, काँग्रेसचे नेते अनंतराव वानखेडे, प्रदीप देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दत्ता घनवट, तसेच अन्य स्थानिक पदाधिकारी, सरपंच, युवा नेते आणि महिला आघाडीच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत जानेफळ सेक्शनच्या समाधानकारक कामगिरीचे कौतुक झाले. तर मेहकर ग्रामीण भाग २, डोणगाव व लोणी गवळी परिसरातील कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले.