Breaking

Sandip Joshi on Vijay Wadettiwar : संदीप जोशींचा वडेट्टीवारांवर पलटवार; काँग्रेस-मुस्लिम लीग एकाच नाण्याच्या दोन बाजू

Congress-Muslim League are two sides of the same coin : काँग्रेसचा इतिहासात तपासून बघण्याचा सल्ला

Nagpur काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या ‘अबू आझमी आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत’ या आरोपावर विधानपरिषद आमदार संदीप जोशी यांनी जोरदार पलटवार केला आहे. काँग्रेस आणि मुस्लिम लीग या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा आरोप संदीप जोशी यांनी केला आहे. त्याचवेळी वडेट्टीवारांना काँग्रेसचा इतिहास तपासून बघण्याचा सल्लाही दिला.

समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी वारकरी संप्रदाय आणि नमाज पठण याविषयी केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादात आता भाजपचे विधानपरिषद सदस्य संदीप जोशी यांनी उडी घेतली आहे. या मुद्द्याला काँग्रेसने राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप भाजपचे नागपूरचे आमदार संदीप जोशी यांनी केला आहे.

Local Body Elections : कोणत्या पक्षाचे वर्चस्व कुठे? नव्या रचनेचा फायदा कुणाला?

अबू आझमी हे एक पिल्लू सोडतात आणि भाजप हिंदू-मुस्लिम भांडण लावतात असा दावा वडेट्टीवार यांनी केला होता. यावर जोशी यांनी प्रत्युत्तर दिले. वडेट्टीवारांनी आधी काँग्रेसचा इतिहास पाहावा. १९५७ मध्ये देशाची फाळणी घडवून आणणाऱ्या मुस्लिम लीगसोबत काँग्रेसचे राजकीय मतभेद आजही दिसत नाहीत. उलट तुष्टीकरणाचे धोरण आजही काँग्रेस चालवत आहे, असं जोशी म्हणाले.

Dadaji Bhuse : विद्यार्थ्यांकडून साफसफाईची कामं; शिक्षणमंत्र्यांच्या कार्यक्रमावरून पेटलं राजकारण

२००६ साली मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात मुस्लिम लीगचे नेते काँग्रेसच्या व्यासपीठावर होते आणि राष्ट्रगीताला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न झाला होता. त्यांची हीच ती मानसिकता आहे व आजही ती काँग्रेसमध्ये खोलवर रुतलेली आहे.अबू आझमी कोणाच्या दबावातून वक्तव्य करतात हे सर्वज्ञात आहे. मात्र काँग्रेस अशा वक्तव्यांना राजकीय हेतूने वापरत आहे. समाजात धार्मिक तेढ निर्माण करणे, हे काँग्रेसचे जुनेच धोरण असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.