Breaking

Ration scam : बुलडाण्यात रेशन घोटाळा; नांदुऱ्यात २५० क्विंटल तांदूळ जप्त

250 quintals of rice seized in Nandura : सिल्वर रोडलाईन्सच्या भूमिकेवर संशय; प्रशासनाकडून चौकशी सुरू

Buldhana तीन महिन्यांच्या रेशन धान्य वितरणाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात काही रेशन माफियांनी सक्रिय होत जनतेच्या अन्नधान्यावर डल्ला मारल्याचे वास्तव समोर आले आहे. नांदुरा येथील एका खासगी गोदामात सुमारे २५० क्विंटल रेशनचा तांदूळ बेकायदेशीरपणे साठवून ठेवल्याचे उघड झाले असून, पोलिस आणि पुरवठा विभागाच्या संयुक्त कारवाईने खळबळ उडाली आहे.

प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, सदर धान्य ओम राठी या रेशन दुकानदाराचे असल्याचे स्पष्ट झाले असून, संबंधित गोदाम तातडीने सील करण्यात आले आहे. नांदुरा तहसीलदार व निरीक्षण अधिकाऱ्यांना तपासणी करून कायदेशीर कारवाईचे निर्देश देण्यात आले असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे यांनी सांगितले.

Jayashri Shelke : बुलढाणा विधानसभेतील निवडणूक वैधतेवर वाद!

शासनाने तीन महिन्यांचा रेशन धान्य एकत्रित देण्याची घोषणा केली असली तरी, जिल्ह्यात पुरेशी गोदाम क्षमता नसल्याने पुरवठा चक्रशृंखलेनुसार टप्प्याटप्प्याने सुरू आहे. मात्र, राशन दुकानांबाहेर विनापरवानगी गोदाम भाड्याने घेऊन धान्य साठवणे कायद्याच्या विरोधात आहे.

या घटनेत ‘सिल्वर रोडलाईन्स’ या रेशन वाहतूक कंत्राटदाराचे नाव चर्चेत आहे. ओम राठी हे नांदुरा तालुक्यात सिल्वर रोडलाईन्सतर्फेच ‘द्वारपोच योजना’ कार्यान्वित करीत होते. त्यामुळे कंत्राटदार कंपनीच्या भूमिकेची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

Uday Samant : हिंदी भाषा सक्तीचे धोरण, उद्धव ठाकरे यांच्याच काळात

नांदुऱ्यात काही महिन्यांत दुसऱ्यांदा रेशनचा बेकायदेशीर साठा उघड झाला असून, मागील कारवायांमध्ये दिरंगाई झाल्याची चर्चा यानिमित्ताने पुन्हा डोकं वर काढू लागली आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी आता जनतेतून जोर धरू लागली आहे.