Breaking

Sudhir Mungantiwar : विकासाची स्पीड अन् प्रशासनावर कमांड ; मुनगंटीवार म्हणजे प्रगतीचा ब्रँड!

Speed ​​of development and command over administration; Mungantiwar is a brand of constant progress : खुदी को कर बुलंद इतना की, हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पुछे की, बता तेरी रजा क्या है…

Nagpur : राजकारण हे समाजातील शेवटच्या टोकावरील माणसाची सेवा करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे, हे मानून गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून सतत नवनवीन कल्पना मांडून त्या प्रत्यक्षात उतरवण्याचे काम राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार करत आहेत. एखाद्या परिसराचे चित्र बदलवणे म्हणजे काय असते, याची प्रचिती चंद्रपूर जिल्हाचा फेरफटका मारल्यावर येते. पद असो अथवा नसो पण आपली बांधिलकी जनतेशी आहे, असे मानत सतत कार्यमग्न असलेला लोकनायक म्हणजे सुधीर मुनगंटीवार, अशी सर्वसाधारण लोकभावना आहे.

२०२४ची विधानसभा निवडणुका झाल्यानंतर महायुतीचे सरकार अस्तित्वात आले. पण यावेळी भाजपचे राज्यातील ज्येष्ठ व दांडगा अनुभव असलेले नेते सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही. इतरही काही ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली. आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला. पण शांत, सुस्वभावी आणि संयमी मुनगंटीवार यांनी कुठलाही विरोध प्रदर्शित केला नाही. तर निमूटपणे पक्षाचा आदेश समजून आपल्या कामात पुढे गेले.

Sudhir Mungantiwar : धान उत्पादक शेतकऱ्यांसाठीच्या पहिल्या टप्प्यातील 94 कोटीचे वितरण सुरू

लौटेंगे वापस अपने उसी अंदाज में…
किताबों पर धूल लग जाने से कहानियाँ खत्म नही होती…
या उक्तीप्रमाणे मंत्रिपद न मिळाल्याची खंत न ठेवता संसदीय आयुधांचा पुरेपूर वापर करून मुनगंटीवार यांनी आमदार म्हणून जोमाने काम सुरू केले. याच वर्षी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी, शेतमजूर, महिला, दिव्यांग, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आदींचे प्रश्न आमदार मुनगंटीवार यांनी आपल्या विशेष शैलीने मार्गी लावले. ‘पद असो अथवा नसो’, मात्र कामाचा धडाका तोच, ही मुनगंटीवारांची खासीयत आहे.

Sudhir Mungantiwar : लोकशाहीची हत्या करणारी काँग्रेसी वृत्ती नष्ट करण्याचा संकल्प करावा

आजही काही मंत्र्यांच्या मागे-पुढे जेवढा गोतावळा नसतो, तेवढा मंत्री नसूनही आमदार मुनगंटीवारांच्या भोवताल असतो. याचे कारण आहे लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास. लोकांना खात्री आहे की, हा माणूस कुठल्याही परिस्थिती आपली कामे करणार म्हणजे करणारच. सुधीर मुनगंटीवार म्हणजे सभागृहात मुलूखमैदानी तोफ, तर राजकीय मैदानावर सातत्याने चौकार आणि षटकारांची बरसात करत फटकेबाजी करणारा हजरजबावी हरफनमौला खिलाडी. या नेत्याच्या बाबतीत एक नक्कीच म्हणता येईल, खुदी को कर बुलंद इतना की, हर तकदीर से पहले…खुदा बंदे से खुद पुछे की, बता तेरी रजा क्या है…
गेल्या सहा महिन्यांत सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारकडून करवून घेतलेल्या काही महत्त्वाच्या कामांवर नजर टाकल्यास हा किती ताकदीचा लोकनेता आहे, हे सहज लक्षात येते.
– धान उत्पादक शेतकऱ्यांसाठीच्या बोनसच्या पहिल्या टप्प्यातील 94 कोटीचे वितरण आमदार मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी सुरू नुकतेच झाले आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना पीक विम्याची विक्रमी 202 कोटीची रक्कम त्यांच्याच प्रयत्नांनी मिळालेली आहे.
– आणीबाणीच्या काळात ज्यांनी लढा दिला, प्रसंगी कारावास भोगला, अशा स्वातंत्र सेनानींना २० हजार रुपये मानधन मिळवून दिले.

– चंद्रपूर जिल्ह्याला हनी हब बनवण्याच्या दिशेने आमदार मुनगंटीवार यांनी दमदार पाऊल टाकले आहे. मधमक्षिका पालनासाठी मामला व पिरली या गावांची ‘मधाचे गाव’ म्हणून घोषणा करण्यात आली. या क्षेत्रासाठी मुनगंटीवार यांचे प्रयत्न गेम चेंजर ठरणार आहेत.

Sudhir Mungantiwar : पोंभुर्णा तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा जनआंदोलन उभारू

– बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमदार निधीतून २१ हातपंप व सोलर पंप बसवण्याच्या कामासाठी ७१ लाख ६२ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता आमदार मिळवली.

– चंद्रपूर येथील पटेल नगरमधील १५ घरांना रेल्वे अधिग्रहणाच्या माध्यमातून प्रत्येकी ८ लाख ४६ हजार रुपयांच्या दराने एकूण १ कोटी २६ लाख ९० हजाराची नुकसान भरपाई मंजूर करवून दिली.

– चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात शासकीय तंत्रनिकेतन स्थापन व्हावे यासाठी पूर्ण शक्तीने प्रयत्न…

– परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तीर्थक्षेत्राच्या विकासाचा प्रश्न यांनी सोडवला.

– चंद्रपूर जिल्ह्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत सुरू असलेल्या कामावरील अकुशल मजुरांच्या थकीत मजुरीचे रक्कम मजुरांच्या खात्यात जमा करण्यात प्रयत्न फळाला.

– आमदार मुनगंटीवार यांनी केलेल्या पाठपुरामुळे चंद्रपूर येथील जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारत बांधकामाचा मा…