jangli Rummy contrvarsi : जाहिराती स्कीप करत होतो, मात्र मला टार्गेट करण्यात आले

Manikrao Kokates clarification on gangli Rummy controversy : जंगली रमीच्या वादावर माणिकराव कोकाटेंचा खुलासा

Mumbai : आमदार रोहित पवार यांनी, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळामध्येच जंगली रमी गेम खेळतानाचा
व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. विरोधकांनी या मुद्द्यावरून कोकाटेंसह सरकारवरही मोठी टीका केली. यावर आता कोकाटे यांनी खुलासा केला असून, मी जाहिरात स्कीप करत होतो, त्यात दोन-तीन सेकंद गेले, मात्र मला टार्गेट करण्यात आले असे म्हटले आहे.

कोकाटे यांनी आपल्या व्हायरल व्हिडिओबाबत स्पष्टीकरण देताना म्हणाले की, मी वरिष्ठ सभागृहात बसलो होतो. त्यावेळी कनिष्ठ सभागृहात काय चाललय पाहण्यासाठी युट्युब प्ले करत होतो. मात्र युट्युब प्ले करत असतानाच जाहिरात आली, ती जाहिरात स्कीप करताना दोन-तीन सेकंद लागले. तुम्हाला तशी जंगली रमी जाहिरात येत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Manikrao Kokate : रमी खेळतानाच्या ‘त्या’ व्हिडिओ मुळे विरोधकांची कृषिमंत्र्यांवर चौफेर टीका !

कोकाटे यांनी आपला बचाव करताना सांगितले की, मी काही पाप केलं नाही. मी जाहिराती स्किप करत होतो त्यामध्ये दोन-तीन सेकंद लागले ते त्यांना दाखवायचं नाही, आम्ही शेतकऱ्यांसाठी केलेला कामावरती ते बोलत नाहीत. माझं काम पारदर्शकपणे आहे. मी कशाला अशा पद्धतीने गेम खेळत बसू . माझ्या काही लक्षात आलं नाही. दुसऱ्या सेकंदाला मी जाहिरात स्कीप केली. मात्र तेवढाच व्हिडिओ दाखवून टार्गेट करण्यात आल्याचे कोकाटे यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरूनही कोकाटे बोलले. ते म्हणाले की आम्हाला शेतकऱ्यांची काळजी नाही का? त्यासाठी आम्ही फिरत आहोत. मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहोत. मात्र, बदनाम करण्यासाठी हा डाव आहे. जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये विशेष असे काय आहे, तुम्हाला जंगली रमीची जाहिरात येत नाही का? रोहित पवारच्या मोबाईलमध्येही अशा जाहिराती येतात. मात्र ते स्वतःची करमणूक करून घेत आहेत. माझ्या विभागासाठी प्रयत्नांची पराकाष्टा सुरू आहे. असेही कोकाटे यांनी स्पष्ट केले.

Sanjay Raut : राज्यातील काही मंत्र्यांना वगळण्याचा अमित शहांचा सल्ला !

 

भाजपला विचारून काम करावे लागते या टीकेवर कोकाटे म्हणाले, कारण नसताना टार्गेट केलं जात आहे. मी असे कोणत्याही प्रकारचे विधान केलेले नाही. माझ्या विभागासाठी प्रयत्नांची पराकाष्टा सुरू आहे. या गोष्टीला एवढं महत्त्व का द्यावं? असा सवाल माणिकराव कोकाटे यांनी केला. मीडिया इतकं डोक्यावर का घेत आहेत? दरम्यान, संजय राऊत यांनी अमित शाह चार मंत्र्यांना डच्चू देण्याचे ठरवले असल्याचा दावा केला आह. त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांचे सुद्धा नाव असल्याचे राऊत म्हणाले. या संदर्भात ते म्हणाले की त्या संजय राऊतला माहित असेल मला काय माहित नाही.