Maharashtra politics : वादग्रस्त घटना, अंतर्गत धूसफूस आणि आरोप प्रत्यारोपचा गाजावाजा

The challenge facing Mahayuti is to build credibility! : महायुती समोर विश्वासार्हता निर्माण करण्याचे आव्हान!

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यातील सत्तारूढ युती म्हणजे भाजप शिंदे गट, आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अंतर्गत कुरबुरी, गैरकारभाराचे आरोप यामुळे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर महायुती समोर विश्वासार्हता निर्माण करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

सर्वात जास्त चर्चा होते आहे ती मंत्रिमंडळ फेरबदलाच्या शक्यतेची. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षांतर्गत बैठकांमध्ये संकेत दिले होते की, लवकरच मोठ्या प्रमाणात फेरबदल केला जाईल. काही मंत्र्यांचे काम समाधानकारक नसल्यामुळे त्यांना घरी पाठवले जाऊ शकते. असे मानले जाते की, सुमारे आठ मंत्र्यांना काढून त्यांच्याऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. हे फेरबदल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेसमोर विश्वासार्हता निर्माण करण्याचा प्रयत्न राहू शकतो.

Mahayuti : महायुतीत पक्षबदल सुरूच; बुलढाण्यात शिंदेसेनेचा भाजपला धक्का!

दरम्यान, विधानसभा अधिवेशनात एक धक्कादायक प्रकार घडला. मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृह चालू असताना मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. या प्रकारानंतर सरकारवर आणि कोकाटे यांच्यावर प्रचंड टीका झाली. विरोधकांनी यावरून प्रश्न उपस्थित केला. जेव्हा राज्यात गंभीर प्रश्नांवर चर्चा होत असते, त्याच वेळी सत्ताधारी आमदार अशा प्रकारे वागतात, याचा अर्थ ते लोकशाहीची थट्टा करतात. त्यामुळे कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे, परंतु अद्याप त्यावर स्पष्ट निर्णय झालेला नाही.

या सर्वांमध्ये अजून एक मोठी बाब म्हणजे झारखंडमध्ये उघडकीस आलेल्या दारू घोटाळ्याचा महाराष्ट्राशी संबंध. संजय राऊत यांनी यासंदर्भात गंभीर आरोप करत सांगितले, या घोटाळ्यात अटकेत असलेली व्यक्ती ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाच्या जवळची आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांची अडचण अधिकच वाढली आहे, कारण भ्रष्टाचारविरोधी सरकार असल्याचे ते वारंवार सांगत आले आहेत.

यातच सांगलीत घडलेली एक दुर्दैवी घटना म्हणजे जलजीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटदार हर्षल पाटील यांची आत्महत्या. सुमारे दीड कोटी रुपयांची बिले थकल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. यामुळे सरकारी यंत्रणेवर आणि निधी वितरणाच्या प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. विरोधकांनी सरकारवर थेट आरोप करत सांगितले की,हे अपयश प्रशासनाचं असून सरकारचा हलगर्जीपणा यामागे कारणीभूत आहे.

एकूणच, सत्ताधारी पक्षांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. मंत्रिमंडळ फेरबदल, गैरप्रकार, भ्रष्टाचाराचे आरोप, प्रशासकीय अपयश आणि जनतेतील नाराजी हे सगळं पाहता, आगामी काळात सरकारसाठी स्थिती आणखी गुंतागुंतीची होऊ शकते. विरोधक या सगळ्या मुद्द्यांचा वापर करून राजकीय वातावरण तापवत आहेत, आणि जनतेमध्ये सरकारविरोधात असंतोषाचे बीज पेरत आहेत.

Vidarbha Farmers : हुमणी अळीने सोयाबीन उध्वस्त, शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

महाराष्ट्रातील राजकारण हे पूर्णपणे अस्थिरतेच्या दिशेने जात आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये अंतर्गत कुरबुरी वाढल्या आहेत, मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरू आहे, आणि विविध गैरप्रकारांमुळे सरकारच्या प्रतिमेला तडा जात आहे. कोकाटेंचा रमी व्हिडीओ, झारखंड घोटाळा, कंत्राटदाराची आत्महत्या सर्व मुद्दे सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणत आहेत. जनतेमध्ये नाराजी वाढतेय आणि विरोधक त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. पुढील काही आठवडे हे महाराष्ट्राच्या राजकीय भविष्याचा मार्ग ठरवणारे ठरतील, यात शंका नाही.