Hashwardhan Sapkal : कमकुवत गृहमंत्र्यांमुळे राज्यात गुन्हेगारीला उत्तेजन

Weak Home Minister responsible for rising crime in the state : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात

Akola खामगाव येथील रोहित पैठणकर यांच्यावर त्यांच्या जात आणि धर्म विचारून करण्यात आलेल्या अमानुष हल्ल्यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. यानंतर सरकारने ठोस पावले उचलण्याऐवजी मौन बाळगल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

मंगळवार, दि. २९ जुलैला सकाळी अकोला येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रोहित पैठणकर यांची त्यांनी भेट घेऊन विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सपकाळ म्हणाले, “ही घटना म्हणजे जातीय तणाव भडकवणारे मॉब लिंचिंग असून, अशा प्रकारच्या घटना आता राज्यात सर्रास घडू लागल्या आहेत. यामागे महायुती सरकारचे अप्रत्यक्ष समर्थन आहे. कायदा-सुव्यवस्थेचे नियंत्रण पूर्णतः ढासळले असून, देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis हे आतापर्यंतचे सर्वात कमकुवत गृहमंत्री ठरले आहेत.”|

Devendra Fadnavis : ‘उमेद मॉल’, पंचायतराज अभियानास मान्यता

त्यांनी पुढे सांगितले की, “हल्लेखोरांनी रोहित यांना ‘गाय चोर’ म्हणून मारहाण केली. त्यांना निर्वस्त्र करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने संपूर्ण राज्यात संताप उसळला आहे. मात्र, अद्याप बुलढाणा जिल्हा प्रशासनाचा एकही अधिकारी रुग्णालयात भेटीस आला नाही, ही गोष्ट सरकारच्या असंवेदनशीलतेचे प्रतीक आहे.”

Supriya Sule : ‘लाडकी बहीण’ योजनेत 4800 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

या वेळी काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रकाश तायडे, आमदार साजिद खान पठाण, डॉ. प्रशांत वानखेडे, अशोक अमानकर, बबनराव चौधरी, महेंद्र गवई, धनंजय देशमुख, तेजेंद्र चौहान, डॉ. जिशान हुसैन, कपिल रावदेव, पराग कांबळे, मनीष हिवराळे, राजेश मटे, सुनील वानखेडे, संदेश वानखेडे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.