व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र ‘मत चोरी’च्या आरोपावरून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या बडतर्फीची मागणी

‘मत चोरी’च्या आरोपावरून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या बडतर्फीची मागणी

 

यशोमती ठाकूर, बळवंत वानखडे, बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Amravati विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेच्या माध्यमातून मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सेवेतून बडतर्फ करून अटक करण्याची मागणी जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात माजी मंत्री यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे आणि जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

निवडणूक आयोगाने स्वतंत्र आणि निष्पक्षपणे निवडणुका पार पाडणे अपेक्षित असताना एसआयआरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप काँग्रेसने निवेदनातून केला आहे. तसेच निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या काही निर्णयांवर आक्षेप घेतल्याचा संदर्भही निवेदनात देण्यात आला आहे.

एसआयआर ही मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाची प्रक्रिया असून, निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर २०२६ साठी एसआयआरशी संबंधित मतदार यादी, नाव शोधण्याची सुविधा आणि मसुदा मतदार यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

५०० ट्रक, ४० टोलनाक्यांचे मालक प्यारे खान आरटीओला एवढे ‘प्यारे’ का?

लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी कारवाईची मागणी

काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप करीत लोकशाही आणि घटनात्मक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ तसेच बिहार आणि पश्चिम बंगालमधील मतदार यादीच्या प्रक्रियेबाबतही निवेदनात विविध आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.

मुहूर्त मिळेना, जिल्हाप्रमुख ठरेना! शिंदेसेनेची जिल्ह्यातील सूत्रे कुणाच्या हाती?

पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सहभाग

या वेळी वीरेंद्र जगताप, राजकुमार पटेल, हरिभाऊ मोहोड, कांचनमाला गावंडे, जयंतराव देशमुख, मुकद्दर खां पठाण, प्रदीप देशमुख, राहुल येवले, शैलेश गवई, रामेश्वर अभ्यंकर, रजनी बेलसरे, प्रमोद दाळू, सुरेश साबळे, दिलीप काळबांडे, सेतू देशमुख, वैभव देशमुख, मुकुंद देशमुख, रमेश सावळे, प्रवीण मनोहर, डॉ. रवींद्र वाघमारे, पंकज वानखडे, सुनील गावंडे, अमोल होले, श्रीनिवास सूर्यवंशी, हरीश मोरे, गजानन देशमुख, प्रकाश काळे, गजानन पाथरे, मुरलीधर नाईक, महेंद्र गैलवार, राजेश सेमलकर, विलास बोरेकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

error: Content is protected !!