Bachchu Kadu : राज्यात आणि केंद्रात मित्र पक्षांवर दबाव आणण्याचे भाजपचे तंत्र !

Amit Shah calls Uddhav Thackeray’s MP to wish him a happy birthday : उद्धव ठाकरेंच्या खासदाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अमित शाह यांचा फोन

Amravati : माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू अनोखी आंदोलने, रोखठोक स्वभाव आणि बेधडक वक्तव्य करण्यासाठी ओळखले जातात. राज्यमंत्री असतानाही त्यांनी आपल्याच सरकारवर प्रहार करताना कुठलीही कसर सोडली नव्हती. त्यानंतर महायुतीचे सरकार आल्यानंतर तर त्यांनी शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी सत्ताधाऱ्यांवर आसुड ओढले. आता त्यांनी भाजपवर मोठा गंभीर आरोप केला आहे.

मराठी भाषेच्या मुद्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. त्याचा धसका घेत महायुती सरकारने शालेय शिक्षणात हिंदी विषयाची सक्ती थांबवली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी गेले. त्यावरून राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना पेव फुटले. या भेटीवर महाविकास आघाडीतील नेत्याच्या प्रतिक्रिया आल्या. या भेटीवर आता बच्चू कडू यांनी भाष्य केले आहे. सगळ्यांना व्यवस्थित कसे ठेवता येईल, यासाठी भाजपने सुरू केलेला हा खेळ आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला गरजुंना ईव्ही प्रदान !

उद्धव ठाकरे यांच्या खासदादाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अमित शाह यांचा फोन आला. उद्धव ठाकरे यांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या, असे सांगत केंद्रामध्ये उद्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी हालचाली करू नये, यासाठी त्यांना हा व्यवस्थित इशारा भाजपने दिला असल्याचे बच्चू कडू म्हणाले. ‘तुम हट गये तो हमारे पास शरद पवार और उद्धव ठाकरे है..’, असाच इशारा भाजपने दिला आहे. भाजप जोड-तोडीचे राजकारण व्यवस्थितपणे खेळत असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

Maharashtra politics : आता एकही चूक खपवून घेतली जाणार नाही !

उद्धव ठाकरे व शरद पवार भाजपला पाठिंबा देतीलच, असे काही निश्चित नाही. पण तसे चित्र निर्माण करण्यात भाजप यशस्वी ठरत आहे. आपल्या मित्रपक्षांवर दबाव आणण्याचे प्रयत्न भाजप पद्धतशीरपणे करत आहे. लोकांना गेम समजू द्यायचा नाही आणि सतत गुंतवून टेवायचे, असं एकंदरीत संभ्रमाचं चित्र भाजप तयार करत आहे, असेही बच्चू कडू म्हणाले.