Prakash Ambedkar gets relief from charity commissioner in peoples education society : अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचा जल्लोष, ट्रस्टी म्हणून मान्यता
Akola डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी (PES) संदर्भातील प्रकरणात महाराष्ट्र चॅरिटी कमिशनर यांनी प्रकाश आंबेडकर आणि ब्रजेंद्र के. चौबे यांच्या बाजूने निर्णय देत त्यांना सोसायटीचे ट्रस्टी म्हणून मान्यता दिली आहे. या निर्णयाच्या स्वागतार्थ अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला.
स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या कार्यक्रमाला प्रदेश युवा महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
NEET paper leak : लाठीमार करून विद्यार्थ्यांचा राग शांत होणार आहे का?; वडेट्टीवारांचा सरकारला सवाल
यावेळी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधती शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला जिल्हाध्यक्ष आम्रपाली खंडारे, युवक जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, सम्यक विद्यार्थी आंदोलनचे इंजि. धीरज इंगळे, महानगराध्यक्ष मजहर खान, महिला महानगराध्यक्ष वंदना वासनिक, महानगर महासचिव गजानन गवई, नगरसेवक पराग गवई, बबलू पातोडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दामोदर जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक शिरसाट, शोभाताई शेळके, माजी नगरसेविका किरण बोराखडे, तालुकाध्यक्ष किशोर जामणिक यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी हा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना बळ देणारा असल्याचे सांगितले. तसेच या निर्णयामुळे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कार्याला नवी दिशा मिळेल आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
Farm Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा; उद्या प्राथमिक यादी जाहीर होणार
दरम्यान, चॅरिटी कमिशनरांच्या निर्णयाविरोधात संबंधित पक्ष उच्च न्यायालयात दाद मागू शकतो. त्यामुळे या प्रकरणावरील अंतिम न्यायिक प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.








