Prajwal Revanna : १२० साक्षीदारांचे जबाब, व्हिडीओ पुराव्यांचा आधार

Former PMs grandson Prajjwal Revanna convicted in rape case. : माजी पंतप्रधानांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार प्रकरणात दोषी

Bengaluru : कर्नाटकमधील हासन लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा यांना एका ४७ वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेवरील बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. विशेष न्यायालयाने हा निकाल दिला असून, शनिवारी शिक्षा सुनावली जाणार आहे.

प्रज्ज्वल रेवण्णा वय ३४ यांच्यावर बलात्काराचे एकूण चार गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांपैकी एका प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आले. घरकाम करणाऱ्या महिलेवर रेवण्णा कुटुंबाच्या फार्महाऊसवर बलात्कार केल्याचे आरोप होते. विशेष सरकारी वकिल अशोक नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या सुनावणीत २६ साक्षीदारांची उलटतपासणी झाली.

Maharashtra politics : सप्टेंबरनंतर राज्यात मोठा स्फोट? सत्तेतील उलथापालथीचे संकेत

या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक एसआयटी नेमले होते. या पथकाने १२० साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून, पीडित महिला आणि इतर साक्षीदारांच्या जबाबांवरून आणि व्हिडीओ पुराव्यांच्या आधारे रेवण्णावर बलात्कार आणि अन्य कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये वारंवार बलात्कार, धमकी, अधिकृत त्यांवर गुन्हा दाखल होता.

Minister of Agriculture : मला कृषीखात्याची ‘ऑफर’ होती, पण मी नकार दिला

या प्रकरणात रेवण्णाचे माजी वाहनचालक कार्तिक एन. हा प्रमुख साक्षीदार ठरला. त्यानेच रेवण्णाचे अश्लील व्हिडीओ प्रसारमाध्यमांपुढे आणले. त्यासाठी त्याच्यावर स्वतंत्रपणे गुन्हा दाखल झाला आहे. कार्तिकने न्यायालयात सांगितले की, एकदा त्याने रेवण्णाचा फोन चोरून पाहिला असता, त्यामध्ये व्हिडीओ आढळले. कार्तिकने २०२२ साली रेवण्णाच्या कुटुंबीयांशी झालेल्या वादानंतर नोकरी सोडली आणि पुढे या व्हिडीओचा पेन ड्राइव्ह भाजप नेते जी. देवराजे गौडा यांच्याकडे दिला, ज्यांनी रेवण्णाचे वडील एचडी रेवण्णा यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.

Maharashtra politics : मंत्रिमंडळाची चर्चा धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही

या प्रकरणाचा उलगडा २०२४ लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान झाला. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतरच संबंधित व्हिडीओ व्हायरल झाले आणि या प्रकरणाची दखल घेण्यात आली. १४ महिन्यांनंतर आता न्यायालयाने निर्णय दिला असून, शिक्षा जाहीर होणे बाकी आहे.

_______