Uddhav Balasaheb Thackeray : जीवंत देखाव्यांमधून महायुती सरकारवर टीका

Shiv Sena criticizes Mahayuti government through protest : उद्धव ठाकरे गटाचे जनआक्रोश आंदोलन, शिंदेसेनेवरही निशाणा

Akola महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘जनआक्रोश’ आंदोलन करत जिवंत देखावे सादर केले. यामधून मंत्र्यांचे रमी खेळणे, नोटा उधळणे, डान्स बारमध्ये मौजमजा, जादूटोणा आणि हनी ट्रॅपसारख्या प्रतीकात्मक घटना सादर करून सरकारवर तीव्र प्रहार करण्यात आला.

‘आम्हाला कलंकित मंत्र्यांची लाज वाटते… भ्रष्टाचारी मंत्र्यांचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले.

Local Body Elections : स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्ते भाजपत!

या वेळी अतुल पवनीकर, संजय शेळके, सुरेंद्र विसपुते, राजेश मिश्रा, राहुल कराळे, ज्ञानेश्वर गावंडे, बबलू देशमुख, नितीन ताथोड, ज्ञानेश्वर म्हैसने, रवी मुरर्तडकर, गोपाल विखे, दीपक मसने, बळीरामजी कपले, डॉ. संतोष हुसे, शिवा मोहोड, विनायक गुल्हाने, आस्तिक चव्हाण, गजानन वानखडे, तसेच महिला आघाडी जिल्हा प्रमुख सरिता वाकोडे, संगीता राठोड, शुभांगी भटकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.