Shashikant Shinde : तरुणांच्या रोजगारासाठी राष्ट्रवादीच पर्याय, शशिकांत शिंदेंचा दावा

Claim that only NCP can provide employment to youth : अमरावतीत भव्य रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

Amravati “राजकारणात आता सामान्य माणसाचा विचार करणारे लोक कमी झाले आहेत. सध्याचे सरकार व्यावसायिकांसाठी काम करते, तर बेरोजगारी झपाट्याने वाढत आहे. मात्र, स्थानिक तरुणांना कायमस्वरूपी रोजगार मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून मोठे प्रयत्न सुरू आहेत,” असे प्रतिपादन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी केले.

शहरातील सांस्कृतिक भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे आयोजित भव्य रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते. यावेळी प्रा. डॉ. हेमंत देशमुख, ज्येष्ठ नेते शरद तसरे, गणेश रॉय, अविनाश ठाकरे, वर्षाताई भटकर, रोशन कडू, अमरजीत जगताप, मंगेश भटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Local Body Elections : स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्ते भाजपत!

प्रास्ताविक करताना प्रा. डॉ. हेमंत देशमुख यांनी, “रोजगार नसलेल्या तरुणांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘जॉब कार्ड’ची निर्मिती करण्यात आली आहे,” अशी माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात हर्षवर्धन देशमुख यांनी प्रा. देशमुख यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

कार्यक्रमात चार हजारांहून अधिक युवकांनी सहभाग घेऊन मुलाखती दिल्या. पात्र ठरलेल्या उमेदवारांना तत्काळ नियुक्तीपत्र देण्यात आले. उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती.

Sharap Pawar NCP : अवैध सावकारांना पोलिसांचे संरक्षण, राष्ट्रवादीचा आरोप

रोजगार मेळाव्यात उपस्थिती दर्शवून आमदार रोहित पवार यांनी तरुणांना प्रेरणादायी संदेश दिला. “बदलत्या युगात नवीन कौशल्ये आत्मसात करत आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. धर्म-जातीत तेढ निर्माण करणाऱ्यांकडे लक्ष न देता, पालक व गुरुजींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. रोजगार मेळाव्यासारख्या संधींचे सोने करा,” असे आवाहन त्यांनी युवकांना केले.