Discussion of the displeasure of Bharat Gogawale of the Shinde group ; शिंदे गटाचे भरत गोगावले यांच्या नाराजीच्या चर्चा
Mumbai : रायगड जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा मान राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री अदिती तटकरे यांना देण्यात आल्याने शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलेल्या यादीत रायगडसाठी अदिती तटकरे आणि नाशिकसाठी भाजपचे गिरीश महाजन यांची निवड करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून अदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात गेल्या काही काळापासून मतभेद आहेत. शिवसेना गटात यंदा ध्वजारोहणाचा मान भरत गोगावले यांना मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र यादीत अदिती तटकरे यांचे नाव जाहीर होताच शिवसेनेत नाराजी पसरल्याचे दिसून आले.
दरम्यान, आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला भरत गोगावले उपस्थित राहणार नसल्याचे समजते. त्यांनी आपण मुंबईबाहेर असून बैठकीला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती दिली आहे. मात्र, त्यांच्या गैरहजेरीमागे ध्वजारोहणाच्या मानपानावरून निर्माण झालेल्या नाराजीचे कारण असल्याची चर्चा आहे.
Uddhav Balasaheb Thackeray : जीवंत देखाव्यांमधून महायुती सरकारवर टीका
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी, जाहीर झालेली यादी ही पालकमंत्रीपदाची नसून फक्त ध्वजारोहणाची आहे, असे स्पष्ट केले. तसेच भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री करण्यासाठी ते आग्रही असल्याचेही त्यांनी सांगितले.
नाशिकमध्ये गिरीश महाजन यांची निवड झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतलेल्या निर्णयाचे पालन करणे ही आपली जबाबदारी असल्याचे सांगितले. या सर्व वादामुळे रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत निर्माण झालेला तणाव पुन्हा समोर आला आह








